अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ही तबकडी असल्याचे बोलल्या जातं आहे. पण नेमक काय आहे हे समजू शकले नाही.
मात्र चंद्रपूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील चार किलोमीटर अंतरावर असलेल्या लाडबोरी गावातील ग्रामपंचायतीच्या मागील खुल्या परिसरात उल्कापात् कोसळल्याचीही चर्चा आहे. या ठिकाणी मोठ्या आकाराच्या लोखंडी रिंग आकाशातून पडल्याची चर्चा आहे.कोणतीही जिवीत हानी झाली नाही.सदर वस्तू हि तांबा मिशरीत वस्तूपासुन बनवलेली आहे असे वाटते खगोल अभ्यासकांनी हा पृथ्वीच्या कक्षेत आलेला उपग्रह असल्याची शंका वर्तवली आहे.
चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातही अशाच प्रकारे आकाशातून लाल झोत खाली पडली तेव्हा ही वस्तू तप्त लाव्हा सारखी होती.व ती थोडी जमिनीत घुसल्याचे चित्र दिसत आहे. ही वस्तू तप्त लाव्हा सारखी होती.ती रींग पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे जमा करण्यात आली आहे.तिला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.