ब्रह्मपुरी:-
ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दिनांक ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी बुधवारला श्री गुरुदेव सेवा मंडळ रनमोचन (खरकाडा)नवीन आबादी यांच्या सौजन्याने रात्रो ८:०० वाजता विदर्भ स्तरीय भव्य खुली खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ व्यासपीठ रणमोचन (खरकाडा)येथे करण्यात आले होते.
या खंजिरी भजन स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणुन खोब्रागडे गुरूजी, राजु ठाकूर गुरूजी, गिरिधर दोनाडकर गुरूजी यांनी काम पाहिले होते. तसेच राष्ट्रसंत विरचित सादरीकरण भजनाचं गायन वादन प्रसार तथा प्रचार "स्वर साधना" युट्यूब चॅनल चे संचालक किशोर दादा पेंदाम यांनी केले.
पहिले बक्षीस (पुरुष गट) २१,००१,दुसरे बक्षीस १५,००१,तिसरे बक्षीस ११,००१,चवथे बक्षीस ९,००१,पाचवे बक्षीस ७,००१,सहावे बक्षीस ५,००१,सातवे बक्षीस ३,००१,ठेवण्यात आले होते.तर महिला भजन मंडळ गटासाठी पहिले बक्षीस ७,००१,दुसरे बक्षीस ५,००१,तिसरे बक्षीस ३,००१,चौथे २००१,पाचवे बक्षीस १००१,बक्षीस आकारण्यात आले होते.
भव्य विदर्भ स्तरीय खुली खंजरी भजन स्पर्धेत महीला, पुरूष भजन स्पर्धेत एकुन ३७ भजन मंडळानी सहभाग नोंदविला होता.
या मध्ये पुरुष गटामध्ये २१ पुरूष भजन मंडळांनी सहभाग नोंदविला होता. तर १६ महीला भजन मंडळ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
प्रथम पारितोषिक राष्ट्रसंत भजन मंडळ जूनोना, व्दितीय पारितोषिक आदर्श गुरुदेव भजन मंडळ निमगव्हाण, तृतीय पारितोषिक हर्षवर्धन भजन मंडळ वणी, चतुर्थ पारितोषीक अखिल भारतीय गुरुदेव भजन मंडळ हिरापुर, पाचवे पारितोषीक भद्रनाथ भजन मंडळ भद्रावती, सहावे गुरुदेव भजन मंडळ विहिरगाव, सातवे गुरुदेव भजन मंडळ अंतरगाव तसेच उत्कृष्ट तबला वादन केवळ बगमारे, उत्कृष्ट खंजरी वादन भद्रावती, उत्कृष्ट हार्मोनियम वादन पिंटू काळे, आणि उत्कृष्ट गायन अनिल ढोरे यांना नियोजित पारितोषिक प्रधान करण्यात आले.
तर महीला भजन मंडळ गटामध्ये प्रथम जिजाऊ नेहरू महीला भजन मंडळ चंद्रपूर, व्दितीय क्रांतीज्योती महीला भजन चणाखा, तृतीय कोकणाई भजन महीला मंडळ कवठा, चतुर्थ गुरुबाबा महीला भजन मंडळ आवळगाव, पाचवे मंजुळामाता महीला भजन मंडळ शिवणी तसेच उत्कृष्ट तबला वादन सुयोग देवाळकर चणाखा, उत्कृष्ट हार्मोनियम वादन बाबा नक्षीने चंद्रपूर, उत्कृष्ट खंजरी वादन शिवनी महीला मंडळ, उत्कृष्ट गायीका सरिता मेश्राम बरडकिन्ही यांना नियोजित पारितोषिक प्रधान करण्यात आले.
या भव्य विदर्भ स्तरीय खुली भजन स्पर्धेत पुरुष महीला भजन मंडळानी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली तसेच सर्व विजयी पुरुष,महीला भजन मंडळाचे श्री गुरुदेव सेवा मंडळ रनमोचन(नवीन आबादी) यांनी अभिनंदन केले.तसेच पुढील वाटचाली सदिच्छा व्यक्त केली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....