वरोरा :- नगर परिषद वरोरा ने विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीला पाणी पुरवठा चे कंत्राट देण्यात आले होते. शहरात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने मालवीय वॉर्डातील पूर्वेश वांढरे वय 4 वर्ष याचा अतिसाराने मृत्यू झाला.सदर मल्टी सर्व्हिसेस कंपनीवर या लहान बालकाचा मृत्यू झाल्याने कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा , पूर्वेश च्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते.मात्र अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर वैभव डहाने हे तहसील कार्यालयातील टॉवर वर चढले .
वरोरा शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीला 5 लाख रुपये प्रति महिना प्रमाणे कंत्राट देण्यात आले होते.या नियम अटी मध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे ,कूपनलिका दुरुस्ती करणे ,विहिरीतील गाळ काढणे असे असताना दिनांक 5 जुलै रोजी मालवीय वॉर्डातील पूर्वेस वांढरे या 4 वर्षीय बालकाचा अशुद्ध पाणी पिण्याने अतिसाराने मृत्यू झाला.तर काहीना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले होते.त्यामुळे या कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून वांढरे कुटुंबीयांना प्रशासना तर्फे आर्थिक मदत देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सामजिक कार्यकर्ते वैभव डहाने यांनी दिनांक 10 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी वरोरा यांना निवेदन देण्यात आले होते.निवेदनाची प्रतीलीपी माहिती म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी ,पोलिस निरीक्षक यांना देण्यात आली होती .मात्र या प्रकरणाला कोणत्याही अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नसल्याने अखेर आज दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 4 वाजताच्या सुमारास वैभव डहाने टॉवर वर चढले होते.त्यांच्या मागण्यासाठी म्हणून अधिकाऱ्यांनी तीन दिवसांचा वेळ मागून पूर्वेस वांढरे या बालकाचा पी एम रिपोर्ट आल्यानंतर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करू असे संकेत अधिकाऱ्यांनी दिले . विविध पक्षातील पदाधिकारी यांनी शेवटी सामजिक कार्यकर्ते वैभव डहाणे यांची समजूत काढत टॉवर वरुन उतरण्यास सांगितले . अखेर वैभव डहाने यांनी टॉवर वर सोबत घेतलेल्या दोन पिशव्या सहित खाली उतरले.
वरोरा नगर परिषद द्वारे विदर्भ मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला एक वर्षासाठी देण्यात आलेल्या 5 लाख रुपये प्रति महिना हा करार वाढवून बालकाच्या मृत्यूची इतकी मोठी घटना घडूनही प्रत त्याच कंपनीला वाढीव निधी 7 लाख रुपये प्रति महिना तीन वर्षासाठी कंत्राट देण्यात आला त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात तीव्र चीड निर्माण झाली असून जनसामान्यांच्या खिशाला कात्री बस्त आहे.
वैभव डहाणे सामजिक कार्यकर्ते
कंपनीविरोधात आंदोलक रस्त्यावर उतरत रस्ता रोको आंदोलन तहसिल कार्यालयासमोर करण्यात आली त्यामूळे काही वेळासाठी वाहतूक खोळंबली होती. पोलिस अधिकारी यांनी विना परवानगी रस्ता रोको आंदोलन केल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करू असे म्हटल्याने रस्ता रोको आंदोलन हे संपुष्टात आले.
नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन
बालकाच्या मृत्यू संदर्भातील पाण्याचे नमुने आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल न प ला प्राप्त झाला असून ते पाणी पिण्यास योग्य आहे असे नमूद केलेले आहे.
संबधित भागातील घडलेल्या
प्रकाराबाबत नगर परिषद स्तरावर तालुका वैदकीय अधिकारी सह चौकशी समिती गठीत केलेली असुन याबाबत सखोल चौकशी सुरु आहे. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.