हिंसे विषयी बोलताना बऱ्याच वेळा आपण ऐकतो कि, अमुक महिलेवर. अमुक मुलीवर हिंसा झाली पण, हिंसा म्हणजे काय ? हिंसेचे प्रकार किती व कोणते? हिंसा कोणाकडून कशावरून कोणत्या कारणावरून हिंसा होतोय हे आपण बघतच नाही, फक्त हिंसा होतोय, महिलांनी जागरूक राहावे, आपल्यावर होणाऱ्या हिंसेला वाचा फोडावी, हिंसा हि शारीरिक, मानसिक, शाब्दिक, लैगिक, कौटूबिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरावरून देखील हिंसा होतोय, तसेच शासकीय योजना, संपत्तीवर महिलांचा अधिकार, इत्यादी,
हिंसा करणारे कोण? आपणच आपल्यापैकी कोणी तरी! राजे महाराजांच्या काळामध्ये राणीच्या दासी होत्या. त्या राणीला हवा झुकत होत्या, आजही नौकर हवा झुकत नसला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपली वेठबिगारी करतोच आणि मालक करून घेतोच. संविधानिक अधिकाराची भाषा बोलतो, पोटात नसताना ओठांमध्ये आणतो आणि कोरड्याच वल्गना करतो. हि आजची संविधानिक भाषा संविधानाला धरून बोलतोय, पण आपण अगदी तीक्ष्ण नजरने आणि चानक्ष वृत्तीने बघितले तर आजची हिंसा आणि पूर्वीची हिंसा यामधील फरक काय आहे, पूर्वी देखील हिंसा होत होती आजही हिंसा होत आहे, आता होणाऱ्या हिंसेला पूर्वी होणाऱ्या हिंसेची सांगड घालून थोडं लिहावे वाटले म्हणून थोडक्यात व्यक्त होतोय.
सत्यवानाची पत्नी सावित्री हि अश्वपती राज्याची एकुलती एक मुलगी होती, बघायला देखणी नाकीडोळी रेखीव, शरीराचा बांधा सरळ अगदी सुशील होती, पूर्वी अगदी लहान असताना म्हणजे पाहिलं न्हान / ऋतुमती (उपवर) येण्याअगोदरच त्या काळातील प्रचलित शब्द स्वयंवर (लग्न) करून देण्याची प्रथा होती, राजा असेल तर अर्धा राजे देऊन अटीशर्तीचे पालन करून स्वयंवर उरकविण्याची प्रथा होती, ही सगळ्यात मोठी हिंसा होती, सावित्री वयामध्ये आलेली असल्याने तिला स्वयंवरासाठी वर मिळेना तिच्या वडिलाने तिला वराच्या शोध मोहिमेसाठी देशोदेशी पाठविले, धूमत्सेन नावाचा राजा लढाया करून थकलेला. वृद्धत्वाने अंधत्व आलेला. लढायांमध्ये सगळे राज्य गमवून बसलेला, असा धूमत्सेन राजा यांचा एकुलता एक मुलगा सत्यवान, आपल्या गरीब निरंक आईवडीलाचा उदरनिर्वाह करण्यासासाठी स्वतः भुकेला राहून आईवडिलांचा भरणपोषण करण्यासाठी लाकूडतोड करी. लाकूडतोड करणाऱ्या सत्यवानाला आपला स्वामी म्हणून निवड करणारी सावित्री. हि कुटुंबा कडून किती मोठी हिंसा आहे, साजेसा वर मिळत नाही म्हणून कोणत्याही मुलाला. मुलगी देऊन मोकळ होणं, हि पद्धती आजही प्रचलित आहे.
पूर्वीच्या काळी वीर्य विवाह म्हणून केला जात होता, या विवाहामध्ये एखादा योध्या वधूपक्षाच्या अटी शर्ती पूर्ण करून विजय मिळविला तर आपल्या कडे असलेल्या मुली त्यांना देऊन टाकण्याची प्रथा होती, याचा एक उदाहरण म्हणजे काशीराजा भीष्म यांनी अंबा, अंबालिका, अंबिका, या तिन्ही बहिणीचा एकच नवरा झाला, वीर्य विवाहामध्ये तीन बायकांचा भर्तार म्हणून याचा उदाहरण देता येतो. राजा ययाती शामकर्ण घोड्याच्या हव्यासापोटी आणि संपतीसाठी माधवी नावाच्या सौदर्यावान मुलीला किती तरी राजाच्या स्वाधीन केले, शामकर्ण नावाचे घोडे मिळविले, गंधर्व विवाह यामध्ये अगदी लहान वयातील वधू आणि वयस्कर वर. तोही दुसऱ्या किवां तिसऱ्या पनातील असेल, यामध्ये महिलेच्या बाजूने कधीच विचार केलेला दिसत नाही. पाच पांडवाची पांचाली /द्रोपदीचा भर सभेत वस्त्र हरण करणे शिवाय पाच- पाच भर्ताराची किवां पाच नवऱ्याची एक कामिनी होणे. हि दुहेरी हिंसा, मर्यादा पुरुषोत्तम राम ज्याला लोक मानतात. त्यांची रामनवमी मोठया उत्साहामध्ये साजरी करतात, तो राम आपल्या गरोदर पत्नीला सीतेला जंगलामध्ये सोडून देतो, त्याने कशाची मर्यादा पाळली होती? रावणाने पर्णकुटीतून पळवून घेऊन गेले म्हणून, कि, रावणाने अतिशय समंजसपणे प्रामाणिक पणे कोणत्याही वाईट नजरेने न बघता, सुसज्ज ताफ्यासह सीतेला अगदी सुरक्षित ठेवले, कोणाची वाईट दृष्टी पडणार नाही, पडू देणारं नाही याची दक्षता घेतली, या रावणाच्या प्रामाणिक पणाला दाद दिली पाहिजे, याचा आदर्श घेतला पाहिजे, पण प्रामाणिक पणावर हिंसा करून दरवर्षी त्याचा दहन केला जातो, हि एक प्रकारची हिंसा आहे, यावर प्रश्न पडतो कि, स्त्री घातकी कोण? राम कि रावण? मर्यादा पुरुषोत्तम कोण? राम कि रावण, इतक सगळा असताना तरीही महिला मोठ्या आनंदाने रामायण, महाभारत पाहतात, हीच मोठी शोकांतिका आहे, अशा प्रकारे पूर्वीपासूनच स्त्रीयावर हिंसा होत आलेल्या आहेत,
दुसरा जातीच्या नावावर हिंसा, ब्राम्हण पूर्व काळापासून प्रत्येकाला शिक्षण घेणे, ग्रंथ आत्मसात करणे, आकलन, अवलोकन करण्याचा प्रत्येकाल स्वतंत्र होत, सवर्ण उच्चभ्रू लोक. वेदाचे अध्ययन, पठन करून आपले पोट भरत होते, आपल्या रोजीरोटीचा मार्ग सोडवीत होते, कनिष्ठ जातीतील व्यक्तीने अध्ययन अध्यापन करून पुढे गेले तर, आपले अस्तित्व कमी होईल, आपल्या उदरनिर्वाहाच्या मार्गावर अडथळा निर्माण होईल. हे पुरतीच ओळखून चलखीने वेद वाचन, श्रवण करण्याऱ्याला कठोर शिक्षा देणे, त्यामध्ये जीभ छाटणे, कानामध्ये गरम तेल ओतणे, सळइने डागविणे असे हिंसक कृत्य करून त्यांना तिथेचे थांबविले असे अनेक हिंसेचे प्रकार आहेत. आपण त्याकडे बघितले तर दिसून येते, त्या काळी फक्त आणि फक्त सवर्णाचा जास्त पगडा होता,
२६ नोव्हेबर १९४९ रोजी संविधान आले, सगळ्यांना संविधानिक अधिकार प्राप्त झाले, व्यक्ती स्वतंत्र, अभिव्यक्ती स्वतंत्र, जगण्याचा अधिकार, संचार स्वतंत्र मतस्वतंत्र इतके स्वतंत्र मिळाले, अजूनही स्त्री स्वतंत्र झाली आहे का? तिच्यावर हिंसा - हिंसाच होत आहे - का? --- का? होतंय हिंसा
सामाजिक काम करणाऱ्या संस्था संघटना उदयास आल्या. एकमेकाकडून माहिती करून घेऊन तसेच एकमेकांकडून वाचक प्रसारक तयार होऊन. होणाऱ्या घटनेचा नामकरण करून एक शुद्ध शब्द निवडला आणि सर्वानुमते त्याला हिंसा हे नाव दिले, हा नाव सगळीकडे प्रचलित झालंय. पितृसत्ताक समाजव्यवस्थेमध्ये हिंसेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे. जो पर्येंत पितृसत्ताक समाज व्यवस्था आहे तोपर्येंत हिंसा जिवंत राहणार. पण हल्ली या हिंसेला वाचा फोडणारी वाचक, न्याय देणारी न्यायव्यवस्था तयार व्हायला लागली आणि हिंसेचे मुद्दे ऐरणीवर आणून पिडीतेला न्याय द्या. आरोपीला शिक्षा द्या, अशा आरोड्या ठोकत रस्त्यावर उतरून न्याय मागत आहेत, पण समाधानकारक न्याय मिळत नाही, कित्येक दिवस चातक पक्षासारखा न्यायाच्या वाटेकडे पिडीतेला बघावं लागतो हि शोकांतिका आहे. पण हि हिंसा केव्हापासून होत होती.
स्त्रीवरील हिंसा फार पूर्वीपासून होत आलेली आहे, राजेमहाराजांच्या काळापासून, गरीब श्रीमंत भेदाभेद, सवर्ण, शुद्र, अतिशूद्र, वैश्य, क्षत्रिय, यामध्ये आपल्यातील जातीयवाद अतिशय फोफाळून दिसत होता पण, आपण कधी यावर विचार केला नाही, फक्त अय्याषित जगत होतो. कोण कसा होरपळून निघत आहे याचा आम्हाला काही सुतक तर नव्हताच पण, थोडीही सुतराम नव्हती. उच्च वर्णीय,उच्च जातीय आणि सवर्ण वर्गातील एवढच घेऊन मिरवत होतो. या अगोदर आपण जातीव्यवस्था, वर्ण व्यवस्था, बघितली पण, कामातील उतरंड, कामातील चढाओढ, यातूनही हिंसा होतोय अशा अनेक प्रकारे महिला महिलावर, मालक नौकरावर हिंसा करताना दिसत्तात, कामाला कस लावणे, त्याला तपासणे, कामामध्ये हस्तक्षेप करणे, अतिरिक्त ताण हि देखील एक प्रकारची हिंसा आहे, हि कधीही न संपणारी हिंसा शृंखला आहे, संपवायची असेल तर वैचारिक प्रगल्भता, सकारात्मक दृष्टीकोन, समता, समानता न्याय, हे गुण अंगीकारणे आवश्यक आहे, अंगीकारणे नाही तर कृतीमध्ये उतरविणे तेवढेच आवश्यक आहे, या लेखाच्या संदर्भाने येवढच विचार मला येथे अधोरखित करावं वाटलं.
ते मी केली, संकलन आणि शब्दांकन:-संगिता तुमडे
आपल्या प्रतिक्रिया द्या....