कारंजा (लाड) : बालपणापासूनच भारतिय जनता पक्षाशी नाळ जुळलेले,कारंजा शहरातील नाभिक समाजाचे नेते अरुण घोडसाड हे सध्या कारंजा शहर भाजपाचे सक्रिय सदस्य म्हणून ओळखले जातात.अरुण घोडसाड यांचे सराफ लाईन कारंजा येथे हेअर सलूनचे प्रतिष्ठान आहे.आपला हा व्यवसाय सांभाळीत असतांनाच त्यांनी बालपणापासून आकाशवाणी वरील बातम्या,क्रिकेट मॅच व वृत्तपत्र वाचनाचे छंद जोपासलेले आहेत. या छंदामधूनच,महत्वाच्या ठळक बातम्या कारंजेकरांना कळाव्यात म्हणून त्यांनी सराफलाईन स्थित आपल्या प्रतिष्ठान समोर,वीस वर्षापूर्वी दि. १ नोहेंबर रोजी "वार्ता फलक" लावलेले असून दि. १ नोहेंबर २०२३ रोजी ह्या वार्ताफलकाला २० वर्ष पूर्ण झालेले आहेत, अरुण घोडसाड हे दररोज अखंडीतपणे सदर वार्ताफलकावर ठळक बातम्या लिहीत असतात.त्यामुळे कारंजा शहरातील हजारो नागरिक त्यांच्या वार्ताफलकासमोर, क्षणभर थांबून,दररोज ताज्या बातम्या,महत्वाच्या घडामोडी, क्रिकेटची,आरटीओ कॅम्पची माहिती,हवामानअंदाज,तापमान इत्यादी माहिती जाणून घेत असतात.त्यांच्या ह्या निःस्वार्थ कार्याची दखल घेऊन,आमदार राजेन्द्र पाटणी,ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्रजी गोलेच्छा इत्यादीनी त्यांच्या वार्ताफलकाला भेट दिली आहे.शिवाय वार्ताफलकाबद्दल त्यांचा गुणगौरव करीत अनेक संस्थाकडून अनेकवेळा त्यांचा सत्कार सुद्धा झाला असून, वार्ताफलकमुळे त्यांना "सेमी-रिपोर्टर (मानद् पत्रकार)" म्हणून ओळखले जात आहे. त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल दैनिक विश्वजगत,दैनिक युवा क्रांति समाचार,साप्ताहिक करंजमहात्म्य तर्फे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी अभिनंदन केले आहे.