ब्रम्हपूरी:(21आक्टो.)
देशभरात माता दुर्गाचा नवरात्रोत्सव सुरू आहे. देशात सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर आणि जयजयकार होत आहे. या दुर्गोत्सवामध्ये चकबोथलीच्या दुर्गा मारोती नखाते या सरपंच रुपी सिंहासनावर आरूढ झाल्या याला दैवी संकेतच म्हटले तर वावगे ठरणार नाही.सरपंच दुर्गाबाईच्या रूपाने गांवाला विकासाची दिशा मिळून गांव समृद्ध आणि भरभराटीला येईल असा आशावाद व्यक्त करून ब्रह्मपुरी विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी दुर्गाबाई व त्यांच्या सर्व सहकारी ग्रा.पं. सदस्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतांना भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभी आहे. असा विश्वास देऊन भविष्यात गावाच्या विकासासाठी जी काही करावे लागेल ते भारतीय जनता पार्टी निश्चितच करेल असा दिलासा दिला.
ब्रह्मपुरी तालुक्यातील चकबोथली ही ग्रा.पं. ही सात सदस्यीय ग्रामपंचायत असून सुरुवातीला येथे काँग्रेसचे चार आणि भाजपाचे तीन सदस्य असल्यामुळे सत्ता काँग्रेसच्या हातात होती. मात्र विद्यमान सरपंच दुर्गाबाई मारोती नखाते यांनी दोन-तीन महिन्यापूर्वी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. काल दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपाकडून सरपंच पदाच्या उमेदवार दुर्गाबाई मारोती नखाते यांनी बहुमत सिद्ध केले आणि चकबोधली ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविला.माजी सरपंच तथा ग्रा.पं.सदस्य मोहन किसन राऊत, सौ.रोहिणी कालिदास मैंद,सौ. निराशा योगीराज सौंदरकर, इत्यादींनी दुर्गाबाईला मतदान करून सरपंच पदी विराजमान केले. निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी श्री.भाकरे, तलाठी चंदा ठाकरे ,ग्रामसेवक ठाकरे यांनी पूर्ण केली.
दुर्गाबाईंना सरपंचरूपी सिंहासनावर विराजमान करण्याकरता जुगनाळा येथील उपसरपंच तथा भाजपा युवा नेते गोपाल ठाकरे यांनी सिंहाचा वाटा उचलून खूप मोठे योगदान दिले आहे. तर चकबोथलीचे भाजपा ज्येष्ठ नेते बाबाराव नखाते, फाल्गुन मैंद,टिकाराम सहारे, पालनदास दोनाडकर,वासुदेव मैंद,बंडू सोंदरकर, प्रमोद मैंद, केवळराम नखाते, विनोद नखाते यांचे सहकार्याने हे शक्य झाले अशा नवनिर्वाचित सरपंच दुर्गाताई म्हणाल्या. भाजपाची विचारसरणी, अतुलभाऊंचं कुशल नेतृत्व आणि कर्तृत्व, अतुलभाऊंचा प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी संपर्क तसेच भाजपा सरकार करीत असलेले विकास कामे यामुळे प्रभावित होऊन अतुलभाऊंच्या नेतृत्वात गावाचा विकास करणे शक्य आहे. हे समजूनच भारतीय जनता पक्षात प्रवेश करून चकबोथली ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा फडकविला असे गौरवोद्गार सरपंच दुर्गाबाई मारोती नखाते यांनी व्यक्त केले.
ब्रह्मपुरी विधानसभा प्रमुख प्रा.कादर शेख, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य प्रा. प्रकाश बगमारे,भाजपा ज्येष्ठ नेते शंकर दादा सातपुते, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहराध्यक्ष इंजिनियर अरविंद नंदुरकर,भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा.रामलाल महादेव दोनाडकर, भाजयुमो शहराध्यक्ष प्राचार्य सुयोगबाळबुद्धे,भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष कांट्रॅक्टर प्रेमलाल धोटे,भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष डॉ. प्रा. अशोक सालोटकर, भाजयुमो जिल्हा सचिव तनय देशकर,भाजपा आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष राजेश्वर मगरे, सरपंच अनिल तिजारे, अनुसूचित जाती जिल्हा पदाधिकारी चुमदेव जांभूळकर,भाजपा महामंत्री द्यानेश्वर पाटील दिवटे, भाजयुमो महामंत्री प्रा.यशवंत आंबोरकर, भाजयुमो महामंत्री इंजिनियर अविनाश मस्के, कार्यालय तथा प्रसिद्धी प्रमुख प्रा.संजय लांबे, माजी पंचायत समिती सदस्य निलकंठ मानापूरे. इत्यादींनी दुर्गाबाईचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या प्रतिक्रिया द्या....