युवा पिढीला बरबादीपासून वाचविले - भाजपा जिल्हाध्यक्षांची प्रतिक्रिया
अकोला:-
ऑनलाईन मनी गेमिंगवर बंदी घालण्याचा कायदा केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण संतोष शिवरकर , जयंत मसने, यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे . असा कायदा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तरुण पिढीला विनाशापासून वाचविले आहे , असे संतोष शिवरकर , जयंत ,मसणे यांनी म्हटले आहे .
शिवरकर, मसने दो चार यांनी म्हटले आहे की , देशातील कोट्यवधी तरुणांना ऑनलाईन मनी गेमिंग चे व्यसन लागले असल्याचे दिसून आले आहे. कमी कष्टात , घरबसल्या प्रचंड पैसा मिळण्याच्या आशेमुळे शहरी , ग्रामीण भागातील ४५ कोटीपेक्षा अधिक लोक या प्रकारचे जुगारी खेळ खेळतात असे दिसून आले होते . देशातील नागरिकांनी दरवर्षी २० हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम या जुगारात गमावली आहे. या खेळांचे व्यसन लागल्यामुळे देशातील कुटुंबे कर्ज आणि संकटात ढकलली गेली आहेत. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही या जुगाराच्या व्यसनाचा फैलाव झाला होता.
या जुगारात झालेल्या नुकसानीमुळे नैराश्य येऊन अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. काही गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर दहशतवाद्यांना पैसा पुरवण्यासाठी केला जात होता. परिणामी ज्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता , असेही दिसून आले आहे. या जुगारातून मिळणारा नफा देशविरोधी कारवायांसाठी वापरला जात होता . त्यामुळेच या सट्टेबाजीच्या खेळांवर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय देशहिताच्या दृष्टीने योग्य आहे. या खेळातील बहुतांश कंपन्या विदेशी असल्याने भारतातील हजारो कोटी रुपये या जुगाराच्या माध्यमातून विदेशात जात होते. त्यालाही आता आळा बसेल , असे शिवरकर, मसने यांनी नमूद केले आहे.
हा कायदा संपूर्ण देशात लागू होईल तसेच देशाच्या हद्दीत किंवा देशाबाहेरून चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन मनी गेमिंग सेवेला देखील लागू होईल. अशा गेमची जाहिरात करण्यालाही या कायद्याद्वारे बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने २०२२ पासून जून २०२५ पर्यंत , १,५२४ बेटिंग आणि जुगार वेबसाइट्स आणि मोबाईल अॅप्स ब्लॉक केले आहेत, असेही . संतोष शिवरकर, जयंत ,मसणे यांनी म्हटले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....