कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) : सौ वृषाली अजय ओक अमरावती यांचं शिक्षण एम एस सी ॲग्री.असून त्या शिवाजी तंत्रज्ञान महाविद्यालय कॉलेजला अमरावती प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत त्यांना समाजसेवेची अतिशय आवड आहे . मनमिळावू कर्तव्यदक्ष अशा सौ वृषालीताई यांची सामाजिक तळमळ, सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्षा सौ शारदा अतुल भुयार कारंजा लाड यांनी स्त्री शक्ती मंच संघटनेच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली. स्त्री शक्ती मंच संघटनेच्या 26 जिल्ह्यांमध्ये महिला कार्यरत आहेत हे विशेष.उल्लेखनीय.
सौ वृषाली ताई ह्या शेतीविषयक विविध प्रकारच्या माहिती देतात शिवाय शेतकरी महिलांना मार्गदर्शन, प्रक्षिक्षण उद्योग देऊन कार्य शाळा घेऊन शेतकरी महिलांना मार्गदर्शन करतात अनेक संस्था मध्ये सहभागी होऊन सहकार्य करतात मशरूम विषयी माहिती देतात. ट्रेनिंग देतात.अनेक वेगवेगळे उपक्रम राबवुन महिलांना बक्षीस देतात. शेतकरी दादा ला शेतीसाठी जोडधंदा दुग्ध व्यवसाय, अनेक व्यवसाय मार्गदर्शन करतात पर्यावरण,शेती, स्वदेशी, उद्योग, रक्तदान, अवयव दान,सतत प्रयत्नशील असतात. शाळेमध्ये लावलेल्या भाजीपाला मुलांना वापरात येतो तो मुलांना आनंद मिळतो आणि सेंद्रिय सकस आहार सोबत सेंद्रिय भाजीपाला मुलांना मिळतो."पाणी अडवा,पाणी जिरवा" मध्ये काम केल.अमरावती शेगांव मार्गावर मैत्रिणीच्या सहकाऱ्यांनी अनेक झाडे लावली . पर्यावरणाची आवड असल्यामुळे त्यांना पर्यावरण संस्थेतही सामिल करण्यात आले.
रासोये कार्यक्रम अधिकारी म्हणून राज्यमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन 2o16 -17 ला गौरविण्यात आले
कोरोना काळामध्ये त्यांनी गोरगरीब जनतेला दिलासा दिला मदतीचा हात दिला निराधारांना मदत केली. स्त्री शाक्ति मंच संघटनेचा उद्देश तळागाळातील गोरगरीब महिलांना शासकीय योजना मिळवून देण्याकरीता प्रयत्नरत राहून निःस्वार्थ सेवा करीत ग्रामीण गाव खेड्यातील महिलासह शहरी नगरपालिका महानगर पालिका स्तरावरील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचा आहे . तरी इच्छुक गरजवंत महिलांनी आपल्या स्वयंरोजगाराकरीता व विविध शासकिय योजनाचा लाभ मिळविण्याकरीता स्त्री शक्ती मंच अमरावती जिल्हाध्यक्षा सौ वृषाली अजय ओक यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन सौ शारदा अतुल भुयार यांनी केले आहे .