वाशिम : आपल्या प्रजासत्ताक देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला बोलण्याचा व लिहिण्याचा अधिकार भारतीय संविधानाने नक्कीच दिलेला आहे.सत्यमेव जयते. हे आपल्या देशाचे ब्रिद असून येथे नेहमी सत्याचा विजय होत असतो. असे मानले जाते.नुकत्याच आपल्या देशातील सार्वत्रिक निवडणूका पार पडलेल्या आहेत. त्यामुळे राजकारणाचा विषय येथे संपला असून सर्वसामान्य नागरिकांनी देखील संपवायला हवा आहे. निकाल काहीही लागो. सर्वसामान्य नागरिकांनी आता राजकारण न करता शांती,संयम व सौजन्य राखायला हवे आहे. दि. 04 जून 2024 रोजी निवडणूकांचा निकाल येणार आहे. निकाल काहीही लागो. सतरा उमेद्वारामधून कुणीही एकच उमेद्वार विजयी ठरणार आहे व सत्ताधिश होणार आहे.तर उर्वरीत सोळा उमेदवार अपयशी जरी ठरले तरीही त्यांना काहीतरी विशेष अनुभव मिळणार आहे. त्यामुळे विजयी उमेद्वाराने अति जल्लोष किंवा नारेबाजी करू नये तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर टिकाटिपणी, इतर पक्ष,देव,धर्म,जातपात,प्रांत,भाषा इ वर टिका करू नये. व्हॉटसप, इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर कुणीही टिकाटिपणी करू नये. कुणावरही आरोप प्रत्यारोप न करता आलेल्या निकालाचे स्वागत करावे व सौजन्य राखावे.संवैधानिक कायद्याचे पालन करून आपल्या नगरीतील शांतता कायम राखावी.अन्यथा शासन प्रशासन वा पोलीस विभागाकडून कार्यवाही होऊ शकते.व विनाकारण एखादी कार्यवाही झाली तर मतदार विद्याथी,युवक किंवा नागरिकाचे भवितव्य दावणीला लागू शकते.त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करावे.व सर्वांनी शांतता राखावी.अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे.