आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोज मंगळवार ला कर्मवीर कन्नमवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथे, सेवापुर्तीचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका कुमारी.ज्योती दिगंबर राऊत उर्फ श्रीमती ज्योती संजय धोटे उपस्थित होत्या. ह्या नियत वयोमानानुसार आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या 32 वर्ष 3 महिने आणि 6 दिवस एवढ्या प्रदीर्घ काळ सेवा देऊन विद्यालयातून त्या सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्ताने विद्यालयाकडून हा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आधुनिक किसान शिक्षण संस्थेचे विद्यमान सचिव सन्माननीय राजेश श्रीराम धोटे साहेब उपस्थित होते .सोबतच विशेष अतिथी म्हणून विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री कराळे सर ,श्री पिलारे सर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते .मंचावर विशेष अतिथी म्हणून विद्यालयाच्या प्राचार्य कुमारी .भारती श्रीराम धोटे मॅडम उपस्थित होत्या .कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांचं स्वागत इयत्ता वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर स्वरात स्वागत गीत गायन करून शब्दसुमनांनी पाहुण्यांचं स्वागत केले. विद्यालयाच्या वतीने सर्व कर्मचारी स्टाफ तर्फे श्रीमती ज्योतीताई संजय धोटे मॅडम यांचा शाल श्रीफळ साडी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला, तर संस्थेतर्फे माननीय सचिव साहेब यांनी सुद्धा कुमारी ज्योती राऊत उर्फ ज्योती धोटे मॅडम यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला .माजी प्राचार्य. श्री पिलारे सर ,श्री.कराडे सर यांनी सुद्धा मॅडम चा शाल ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री बगमारे सर यांनी केलं ,अगदी सुरुवातीपासूनच कुमारी ज्योती राऊत मॅडम यांच्या बद्दल विद्यालयातील अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या चांगल्या स्वभावाबद्दल, त्यांचा विज्ञान विषयात असलेल्या प्रचंड ज्ञानाबद्दल आपापल्या भाषणातून सांगितले. त्या विद्यार्थी प्रिय आणि शिस्तप्रिय शिक्षिका होत्या.त्या प्रदीर्घ सेवेत असताना अनेक सुखद अनुभव व शाळेची जडण घडणं कशी झाली आणि त्यात स्व.संजय श्रीरामजी धोटे ,आणि श्रीमती ज्योती संजय धोटे मॅडम यांचा कसा सिंहाचा वाटा आहे हे
आधुनिक किसान शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय राजेश श्रीरामजी धोटे साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्व उपस्थित्ताना सांगितले.विद्यालयाच्या प्राचार्या कु. भारती धोटे मॅडम यांनी ज्योती मॅडम यांच्या चांगल्या स्वभावामुळे विद्यालय आणि घर अगदी सहजतेने खेडिमेडीच्या वातावरणात फुलले असे सांगितले.व यापुढील आयुष्य आनंदात सुदृढ जावो अशी प्रार्थना केली.ज्योतीमॅडम ह्या आधुनिक किसान शिक्षण संस्थेच्या सदस्य असून सुध्दा त्यांनी कधीच आपल्या पदाचा अधिकचा अभिमान न बाळगता सर्व शिक्षकांमध्ये मिळून मिसळून रहायच्या . आपल्या प्रदीर्घ सेवा काळात अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले.त्यांच्याच सोबत आज घडीला त्यांनी शिकविलेले 3 विद्यार्थी त्यांचे सहकारी शिक्षक म्हणून याच ठिकाणी कार्यरत आहेत .अनेककांनी यांच्या बद्दल, त्यांच्या जीवन कार्याबद्दल ,त्यांच्या सेवेबद्दल ,त्याच्या सुसंस्कृत, विनम्र ,शांत, स्वभाव गुणाबद्दल ,अनेक अनुभव आपल्या वक्तव्यात कथन केले .अनेकांनी आपल्या भाषणातून पाणवलेल्या डोळ्यांनी मॅडमला सेवानिवृत्तीनंतर निरोगी आयुष्य लाभो, अशा शुभेच्या विद्यार्थ्यांसह अनेकांनी दिल्या . या कार्यक्रमाला श्रीमती ज्योती संजय धोटे मॅडम यांच्या मोठी कन्या श्वेता ,आणि लहान कन्या सुजाता ,आवर्जून उपस्थित होत्या, सोबतच बाळादादा ,निनाद दादा ,नेहताई गडे उपस्थित होते .खेडीमेडीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप ढोरे सर यांनी केले ,तर आभार श्री बगमारे सर यांनी मानले.