कारंजा : श्रीमंत व मध्यमवर्गीयांच्या हातात सदैव पैसा खेळता रहात असल्याने साधारणतः त्यांचे दररोजचे जीवन ऐशाआरामाचे असते . दररोज सण त्यौहार असल्या प्रमाणे ते हवे ते गोडाधोडाचे खाद्यपदार्थ दररोजच खात असतात. आणि हवे तेव्हा नविन कपडे घेऊन त्यांची हौस पूर्ण करीत असतात. त्यामुळे दिवाळीचा अनुभव त्यांचे करीता रोजचाच असतो . मात्र या उलट या प्रचंड महागाईच्या काळात तळागाळातील - गोरगरीब - दिव्यांग - वयोवृद्ध - विधवा - निराधारांच्या आयुष्यात मात्र केवळ सणा त्योहारांनाच आनंद अनुभवता येत असल्यामुळे त्यांच्या जीवनात दिपावली सणाला अनन्य साधारण महत्व असते. त्यामुळे दिपावलीला त्यांना सुद्धा दिपावली सणाचा आनंद उपभोगता यावा म्हणून शासनाकडून त्यांना तुटपूंजे का होईना पण संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजनेचे अनुदान सहकार्य देण्यात येते. तालुक्याच्या ठिकाणी संजय गांधी योजना विभाग तहसिल कार्यालयामार्फत, राष्ट्रीयकृत बँकांमार्फत आणि सहकारी बॅकामार्फत पाठविण्यात येते. दिपावली २०२२ निमित्त सुद्धा सदर्हु अर्थसहाय्य पाठविण्यात आल्याचे कळते . मात्र संबधित बँकामधील पगारदार शासकिय कर्मचारी यांच्या दिवाळी पगाराच्या घाई गर्दीत, दिव्यांग - वयोवृद्ध - निराधारांना सुद्धा कपडालत्ता - किराणा घेऊन दिवाळी साजरी करता यावी यास्तव संबधित बँकानी दिपावली पूर्वी प्राधान्याने निराधारांना अनुदान वितरीत करून त्यांना दिवाळी साजरा करता यावी आणि त्यांच्या चेहर्यावर सुद्धा हास्य फुलवावे याकरीता प्राधान्याने अनुदान वितरण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी तहसिलदार धिरजजी मांजरे सरांकडे केली आहे .