चंद्रपूर, दि. 1 : गीग कामगारांसमोरील वाढलेली आव्हाने, कामाची खराब परिस्थिती, कामाचे अनियमित तास, अस्थिर उत्पन्न इ. उदयोन्मुख समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक असून त्याकरिता कामगार विभागाच्या वतीने सर्व गीग आणि प्लेटफॉर्म कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी.
कोण नोंदणी करू शकतात : झोमॅटो, स्वीग्गी, ओला, अर्बन कंपनी, फ्लीपकार्ट, ऐमेझॉन व इतर कोणत्याही डिजीटल प्लॅटफॉर्मवर काम करणारे डिलिवरी बॉय, चालक र्फ्रिलॅान्सर, घरगुती सेवा पुरवठादार व इतर तत्सम असंगटित कामगार
नोंदणीसाठी पात्रता : वय 16 ते 59 असावे, आयकर भरणारा नसावा, EPFO व ESIC चे सदस्य नसावे.
आवश्यक कागदपत्रके : आधारकार्ड, आधारकार्डशी लिंक असलेले मोबाईल नंबर, पॅन कार्ड
नोंदणीचे फायदे : भविष्यातील कल्याणकारी योजनांमध्ये समावेश
नोंदणीसाठी आपल्या नजीकच्या महा ई-सेवा केंद्र, इमारत व इतर बांधकाम कामगार सुविधा केंद्राला भेट द्या किंवा http://register.eshram.gov.in/#/user/platform-worker-ragistration या लिंकवर स्वतः ऑनलाईन नोंदणी करा. तुमच्या हक्काचे संरक्षण आणि उज्वल भविष्यासाठी आजच ई-श्रम पोर्टलवर नविन प्लॅटफॉर्म टॅब वर नोंदणी करा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त प्रवीण कावळे यांनी केले आहे.
संपर्क : अधिक माहितीसाठी सहायक कामगार आयुक्त चंद्रपूर यांचे कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, तळ मजला, चंद्रपूर येथे संपर्क करावा.