वाशिम : स्थानिक परिवर्तन कला महासंघ वाशिमचे जिल्हाध्यक्ष तथा केन्द्रिय मानवाधिकार संघटना वाशिम चे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम यांच्या नेतृत्वात लोककलावंत गायक सुरेश श्रुंगारे, शाहिर लोडजी भगत, दत्ता वानखडे, सचिव रतन गायकवाड, महिला अध्यक्ष लिलाताई गायकवाड, उपाध्यक्षा जिजाबाई धनगावकर, महासंघाचे ज्येष्ठ कलावंत शाहिर विश्वनाथजी इंगोले इत्यादी कलावंतानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन, त्यांचे परिवर्तन कला महासंघातर्फे सहर्ष स्वागत केले. यावेळी त्यांनी कोव्हिड 19 कोरोना संचारबंदीनंतर, शासनाने राबविलेल्या कोव्हिड अर्थ सहाय्याचे पाच पाच हजार रुपये, कलावंताना मंजूर करूनही , त्यांच्या खात्यात जमा न झाल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या कडे केली. त्यावेळी पिठासिन, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी लगेच परिवर्तन कला महासंघाच्या तक्रारीची दखल घेऊन, सांस्कृतिक विभाग मुंबई येथे चौकशी करून शासनाना कडून मंजूर झालेले अर्थसहाय्य लवकरात लवकर जमा करण्यात येतील याकरीता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना भ्रमणध्वनीवरून दिली असल्याचे संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाला कळविले आहे.