वाशीम : वाशीम लोकसभेत सलग पाच वेळा खासदार म्हणून विक्रम करणार्या भाग्यशाली खासदार भावनाताई गवळी अखेर आज शिंदे गटा सोबत सामिल होऊन पुढील भविष्यातील उमेद्वारी मिळविण्याच्या दृष्टीने शिंदे समर्थक म्हणून यशस्वी झाल्यात. त्यापूर्वी सुरुवाती पासूनच, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्गज युवा आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री संजय राठोड हे सुध्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले होते. संजय राठोड हे बंजारा समजाचे पॉवरफुल्ल नेते म्हणून सर्वश्रूत असून यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी विकासाची शेकडो कामे केलेली आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्हयाचे ते लाडके नेते म्हणूनही ओळखले जातात. आता दोघेही नेते शिंदे गटात सामील झाल्यामुळे त्यांचे आपसातील ऐक्य होऊन यवतमाळ वाशिम जिल्ह्यात विकासाची अनेक कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. अशी अपेक्षा मतदार नागरीक व्यक्त करीत असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी व्यक्त केली आहे .