वाशिम : वाशिम जिल्हा निर्मिती गेल्या १ जुलै १९९८ पासून झालेली असली तरी सुद्धा ह्या जिल्ह्याला वेळोवेळी जास्त काळ पर्यंत बाहेरचेच पालकमंत्री मिळाल्याने, वेळोवेळी दुर्लक्षित व मागासलेल्या वाशिम जिल्ह्याचा अद्यापपर्यंत हवा तसा विकास झालेलाच नाही. शिवाय गेल्या विधानसभा निवडणूकीपासून तर जिल्हयातील माजी पालकमंत्री महोदयांनी शासकिय - निमशासकिय समित्यांचे गठणच न केल्याने जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष बाकी राहीला आहे. शिवाय सर्वसामान्य तळागाळातील लोकांची किरकोळ कामे सुद्धा रेंगाळलेलीच आहेत. गेल्या काही आठवड्यापूर्वी पालकमंत्री म्हणून स्थानिक यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील दारव्हा दिग्रस विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा अन्न व औषध आणि सामाजिक न्यायमंत्री ना संजय राठोड यांची पालकमंत्री म्हणून निवड झाल्यामुळे वाशिम जिल्हाचा विकासाचा अनुशेष भरून काढल्या जाऊन जिल्हयातील विकासाची कामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. ना. संजय राठोड यांना वाशिम जिल्हाची खडान् खडा माहिती असून ते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात विकासपुरुष म्हणून ओळखले जात असून तिर्थक्षेत्र पोहरादेवी, धामणगाव देव, इ अनेक विकासाची कामे त्यांच्या हातून पूर्ण झालेली असल्यामुळे वाशिम जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाकडून वाशिम जिल्ह्याला अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी आता लवकरात लवकर जिल्ह्यातील नियोजन समिती, संजय गांधी स्वावलंबन समिती, जिल्हा वृद्ध साहित्यीक कलावंत समिती सह सर्वच शासकिय निमशासकिय समित्यांचे दिवाळीपूर्वी गठण करण्याची मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक संजय कडोळे यांनी त्यांचेकडे लावून धरली आहे.