अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार साहेबां बद्दल अतिशय हिन बदनामीकारक मजकूर कवितेच्या माध्यमातून समाज माध्यमांवर पसरवून मा.शरद पवारसाहेबांची बदनामी केल्याने केतकी चितळे हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणेबाबत
ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे
तक्रार दाखल करण्यात आली.
तीन दिवस अगोदर मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.शरद पवार यांच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीवर एका कवितेतून लिखाण करून समाज माध्यमांवर ती पसरवून बदनामी केल्यामुळे साहेबांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील आणि देशातील करोडो नागरिकांचे आणि आमच्या सारख्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे केतकी चितळे विरुद्ध आद.शरद पवार साहेबांची बदनामी केल्या प्रसंगी दाखल करावा अशी तक्रार पोलीस स्टेशन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ब्रम्हपुरी कडून करण्यात आली यावेळी तक्रार देतांना वासुभाऊ सोंदरकर तालुका अध्यक्ष, आश्विन उपासे युवा तालुका अध्यक्ष, पराग बनपुरकर, मोंटू पीलारे, जनता ठेंगरी, तुळशीराम काटलाम, हरिदास ठेंगरी, राहुल भोयर, आदेश मालोदे, गजानन नवलाखे, अक्षय जांभुळे राजु माटे, सोनु गेडाम व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.