अकोला:- वायू प्रदूषण, उच्च रक्तदाब या कारणांमुळे दरवर्षी ७० लाखांहून अधिक लोक पक्षाघाताने (स्ट्रोक) मरण पावत आहेत. पक्षाघात रोखणे किंवा त्यावर उपचार करणे शक्य असले तरी जगात १९९० ते २०२१ या कालावधीचा विचार केला तर लोकसंख्यावाढ, वृद्धत्व, जोखीम असलेल्या गोष्टींच्या नित्य संपर्कात येणे यामुळे पक्षाघातामुळे मृत्यू
होण्याचा धोका वाढला आहे. यासंदर्भातील नव्या संशोधनावर
आधारित लेख लॅन्सेट न्यूरॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला किंवा तो कमी झाला तर त्या भागाला ऑक्सिजन व पोषक तत्त्वे कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मृतवत होऊन पक्षाघात होतो किंवा मृत्यू येतो. पक्षाघाताचा धोका रोखता येण्यासारखा आहे.
मात्र, २३ घातक घटकांमुळे हा आजार होण्याची शक्यता बळावते.
त्यामध्ये वायू प्रदूषण, शरीराचे अधिक प्रमाणात वाढलेले वजन, उच्च रक्तदाब, धूम्रपान, कमी प्रमाणातील शारीरिक हालचाली यांचा समावेश आहे.
या नव्या संशोधनाचे निष्कर्ष यंदा वर्ल्ड स्ट्रोक काँग्रेसमध्ये सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, २०२१ मध्ये १ कोटी १० लाख लोकांना पक्षाघाताचा विकार झाला. त्यातील ७३ लाख लोकांचा मृत्यू झाला. जगात ज्या कारणांमुळे सर्वाधिक मृत्यू होतात त्यात पक्षाघात तिसऱ्या स्थानावर आहे.
पुरेसा पौष्टिक आहार न घेणे धोकादायक
धूम्रपान, वायू प्रदूषण या दोन गोष्टींमुळे मेंदूचा पक्षाघात होण्याचा मोठा धोका असतो असे नव्या संशोधनात आढळून आले. हा आजार रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न अपुरे आहेत. पुरेसा पौष्टिक आहार न घेणे हेही हा आजार होण्याचे एक कारण आहे.
साभार लोकमत टीम नवी दिल्लीचा अहवाल
वाढत्या प्रदूषणाला टाळण्या साठी बाईकचा वापर वाढवणे काळाची गरज आहे आणि यामुळे प्रदूषण पण होणार नाही आणि पेट्रोलचा डिझेलचा प्रदूषणावर परिणाम होणार नाही आणि सरकारची देखील पैसे वाचतील यासंदर्भात आज माननीय खासदार अनुपजीत धोत्रे यांचे सोबत ई वेहिकल चे प्रमोशन करणारे आणि लोकांना रोजगार देणारे किसन धोत्रे ए डी एम एस औरंगाबाद सहकारी अजय जागीरदार गुणवंत डिगोळे आणि अकोल्यातील सहकारी यांनी आज खासदार अनुप धोत्रे यांचे स्वागत करून इ व्हेहिकलचा वापर कसा फायद्याचा आहे याची माहिती दिली याबाबत विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन किसन धोत्रे यांनी दिले आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....