हत्तीचा कळप गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर आहे. शुक्रवार, 21 या कळपाने राजोली, भरनोली, शिवरामटोला, बल्लीटोला या परिसरातील शेतात धानरोवणीचे मोठे नुकसान केले आहे.
या कळपातील एक तस्कर हत्ती भरकटला असून तो देवरी तालुक्यातील जेटभावडा येथे दिसल्याचे समजते.
गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीचा कळप अर्जुनी मोरगाव तालुक्यात आला. बर्याच दिवसाच्या मुक्कामानंतर तो परतीच्या मार्गाला लागला आहे. या तालुक्याच्या मुक्कामात कळपाने शेतकर्यांचे बरेच नुकसान केले आहे. हा कळप ईटियाडोह धरण नजीकच्या झाशीनगर उपसा सिंचन योजने शेजारच्या पहाडावर होता. चार ते पाच दिवसापासून या कळपाचा राजोली, भरनोली, शिवरामटोला, बल्लीटोला परिसरात शेतशिवारात धुमाकूळ सुरू होता. शुक्रवारी या कळपाने सुमारे 18 शेतकर्यांच्या शेतात नुकसान केले असल्याची माहिती आहे. गुरुवार व शुक्रवारी
हत्तीच्या कळपाने राजोली व परिसरातील धानरोवणी तुडवली. दोन दिवसात सुमारे 31 शेतकर्यांच्या धान पिकांचे नुकसान झाले आहे. तत्पूर्वी बुधवारी उमरपायली परिसरात नुकसान केले आहे. उमरपायली येथील नुकसानग्रस्त शेतकर्यांत आनंदराव जांभुळकर, गोपाल शेंडे, आडकू नाईक, पंढरी बुद्धे, दिलीप बुद्धे, वासुदेव मस्के, फागू कोल्हे, दुधराम मस्के ,रामदास मस्के, सुनीता लांजेवार, रामलाल लांजेवार, जगन लांजेवार, नामदेव लांजेवार, तसेच भरनोली बोरटोला येथील गणपत चौधरी, रमेश चौधरी, बकाराम नाईक, सदाराम नेताम, जयवंता मडावी, रघुनाथ कोवाची, मोहनलाल कुंबरे, धनीराम कुंबरे, मेनका कुंबरे, केशव कराडे, रवींद्र कराळे, विश्वनाथ सलामे, सुनिता सलामे, रयनलाल हारामी, दुधराम हारामी, देवराम हरामी व चुन्नीलाल हारामी यांचा समावेश आहे. शनिवारी हा कळप गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील शिंदेसुर, ब्राह्मणी या परिसरात दाखल झाल्याचे समजते.
त्या शेतकर्यांना नुकसान भरपाई द्या : आमदार चंद्रिकापुरे
हत्तीच्या कळपाने तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्यावर खरीप हंगामाला मुकण्याचे संकट ओढवले आहे. अशात नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देवून केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....