कारंजा(लाड) : प्रधानमंत्री माननिय नरेंद्रजी मोदी यांनी तळागाळातील, वाडे पाडा तांडा अगदीच काय तर पालावरच्या गोरगरीबांना जन धन योजनेचे बँक खाते काढण्यास भाग पाडले व निराधारांची संजय गांधी योजना,श्रावण बाळ योजनांची खाती याला जोडली. यापैकी अनेक खातेदाराची खाती कारंजा येथील,डाँ. आंबेडकर चौकातील इन्नानी कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत आहेत.परंतु हे खातेदार व्यवहारा करीता बँकेत गेल्यानंतर यांना अपमानजन्य वागणूक दिल्या जात असल्याच्या तक्रारी असून, तुमच्याकडे वेळच वेळ आहे. तुम्हाला बँकेतुन पैसे मिळत नाहीत.तुम्ही ग्राहक केन्द्रावर जाऊन पैसे काढा असे सांगीतले जाते.तसेच ग्राहककेन्द्रामध्ये, निराधार व इतरही खात्याचे पैसे काढावयाचे असल्यास,कमिशन म्हणून जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी असून,संबधित तक्रारीची माननिय तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी दखल घेण्याची मागणी होत आहे.