वाशीम : केव्हाही मतदारांनी लोकसभेकरीता खासदार निवडून देतांना, तळागाळातील गरीब व मध्यम वर्गीयांची जाण ठेवणारा आणि सर्वसामान्यातील आपला जीवाभावाचा माणूस निवडून दिला पाहिजे.सध्या महाविकास इंडिया आघाडीचे उमेद्वार संजय देशमुख हे शेतकरी कुटूंबातील सर्वसामान्य गरीब व मध्यम वर्गीयांच्या परिचयाचे,प्रचंड लोकप्रियता असणारे उमेद्वार आहेत.मतदार आपल्या अडीअडचणी,आपले गाऱ्हाणे त्यांना अगदी रात्री बेरात्री देखील सांगू शकतात.तसेच संजय देशमुख हे सुद्धा उन्हाळा असो वा पावसाळा,दिवस असो वा रात्र, अगदी रात्री बेरात्री देखील मतदाराच्या अडीअडचणी सोडविण्यास तातडीने उपस्थित होऊ शकतात.शिवाय गेल्या पंचवीस वर्षात मतदार संघात झालेली नाहीत ती विकास कामे करून जिल्हयाला आकांक्षित मागासलेल्या जिल्हयाच्या यादीतून बाहेर काढून, जिल्ह्यातील विकासकामे करून कायापालट करून जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देऊ शकतात.त्यामुळे अशा कतृत्ववान व्यक्तीला म्हणजेच महाविकास आघाडीचे कतृत्ववान उमेद्वार संजय देशमुख यांच्या मशाल या बोधचिन्हाचे बटण दाबून त्यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी सरपंच प्रदिप वानखडे यांनी केले आहे.