सामाजिक सुरक्षितता म्हणून औषधांच्या अकोल्यातील बेकायदेशीर उद्योगावर अंकुश आणण्यासाठी सामाजिक संवेदनशीलता म्हणून सक्रियता दाखविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते संजय कृष्णराव देशमुख यांनी कैलेल्या तक्रारीनुसार अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगरताच शुक्रवारी दवाबाजारात दाणादाण उडाली.तक्रारकर्त्यांच्या तक्रारीनुसार कार्यवाही करण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी आणि त्यांचे सहकारी दवाबाजारात दाखल झाले .त्यांनी व्यापाऱ्यांचा विनापरवाना जागेत बाहेर पडलेल्या औषधांचे साठे ताब्यात घेऊन विनापरवाना असलेल्या ईतर साठ्यांवर कारवाई करण्यासाठी पुढे सरसावणार तोच अवैध व्यवसाय करणाऱ्या काही व्यापाऱ्यांच्या तथाकथित नेत्यांनी दवा बाजार बंद करण्याचा निर्णय घेऊन सर्व ठोक व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे फर्मान सोडले.जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार आरोग्य क्षेत्रातील ठोक औषधी दुकानांचे बंद पुकारून किरकोळ औषध विक्रेते आणि रूग्णालयांना वेठीस धरू शकत नाहीत".असा शेरा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी नंतर सादर केलेल्या अर्जावर लिहल्याचे समजते.तरीही व्यापाऱ्यांनी शुक्रवारी दिवसभर आपली दुकाने उघडली नव्हती.हा एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेचा उपमर्द करणे असल्याचे तक्रारकर्ते सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख यांनी म्हटले आहे.आरोग्यक्षेत्रात वाढलेली औषधांची बेफाम अवैध साठेमारी , गर्भनिरोधक गोळ्या,एम.टी.पी किट,त्याचप्रमाणे नशेसाठी झोपेच्या गोळ्या आणि कोडीन सायरप याचे फार मोठ्या प्रमाणात
दुरूपयोग होत आहेत.औषधांचा पुरवठा सरळ खाजगी रूग्णालयांना करून, गर्भनिरोधक गोळ्यांचे बिलिंग दुसऱ्यांच्या नावे करून तिसऱ्यांलाच ह्या गोळ्या पूरविण्याचे गोरखधंदे या क्षेत्रात चालत आहेत. समाजविघातक बेकायदेशीर कृत्ये करून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी रूग्णांच्या आरोग्यसुविधेत अडचणी निर्माण करणाऱ्या अशा व्यापाऱ्यांच्या विरोधात आपण आपल्या मानवाधिकारानुसार सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या १० ते १५ वर्षापासून चळवळ उभारली.परंतू परवाच्या तक्रारीनंतर त्यांचेवरील कारवाई टाळण्यासाठी दवाबाजारातील ठोक औषधी व्यापाऱ्यांनी दवाबाजार बंद ठेवण्याचा चतूर पावित्रा घेतला, आणि उलट माझ्यावरच खंडणीचा आरोप लावून करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचा आरोप संजय कृष्णराव देशमुख यांनी या संदर्भात केलेला आहे. यापूर्वीही आपण असे बेकायदेशीर साठे पकडून दिलेले आहेत.या कारवाईनंतर बाहेर आलेल्या बातम्यांसंदर्भात घेण्यात आलेल्या बाईटच्या वेळी "आपले उद्योग सरळ आहेत तर आपण कारवाईला सामोरे न जाता दवाबाजार बंद का केला" असे प्रश्न विचारण्याचे कर्तव्य मीडियाच्या बांधवांनी पार पाडायला पाहिजे होते अशी अपेक्षा संजय देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली आहे. असे उद्योग करणाऱ्या काही ठोक व्यापाऱ्यांच्या या बेकायदेशीर उद्योगांचे पुरावे आपणाकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी माझ्यावरील आरोपाची चौकशी करावी आणि खोट्या ठोक औषधी विक्रीवाल्यांवरील कारवाया अधिक कडक करण्याचे आदेश अन्न व औषधी प्रशासनाला देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जातून केली आहे.
त्यांनी दवाबाजारातील ठोक औषधी व्यापारी हे विना परवाना साठेबाजी करीत नियमांची पायमल्ली करून असून वऱ्हांड्यातील धुळ व घाणीमध्ये औषधांचे साठे करीत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे केली होती.त्यानुसार गेल्या शुक्रवारी झालेल्या कारवाईने खळबळ उडाली असून आगामी काळात अकोला जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट संघटनेची निवडणूक असल्याने त्यादरम्यान झालेल्या या कारवाईने निवडणूक चित्रच बदलणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.काळे बाजार करून आरोग्यक्षेत्रातील सामाजिक सेवेशी प्रतारणा करणाऱ्या अशा अप्रामाणिक ठोक औषधी विक्रेत्यांविरूध्द आक्रमक पावित्रा घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची खरी आवश्यकता आहे.म्हणून अशा ठीकाणी समाज आणि मीडियानेही लक्ष देऊन आपले सामाजिक कर्तव्य बजावले पाहिजे अशा अपेक्षा समाजातील जबाबदार सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत.