कारंजा(जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) भारताची पहिली बाजार समिती म्हणून प्रसिद्ध असलेल्या कारंजा (लाड) कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती व उपसभापति पदाची निवड दि 17 मे रोजी दुपारी 3:00 वाजता, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात झाली असून,नुकतेच काही दिवसांपूर्वी शेतकरी विकास पैनलचे 18 पैकी 18 संचालक मंडळ निवडून आले होते.
त्यामुळे बुधवारी सभापती पदाकरीता निवडणुक अविरोध झाल्याने, कारंजाचे विकास महर्षी माजी आमदार स्व.प्रकाशदादा डहाके यांचे नंतर देशाच्या पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रथमच तालुक्यात सभापती पदावर विराजमान होण्याचा बहुमान पहिल्या सभापती महिला म्हणून श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके यांना मिळाला आहे.कृषी उत्पन्न बाजार समितिच्या सभागृहात निवड़ीसाठी घेण्यात आलेल्या या सभेत सभापति व उपसभापति यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने पिठासिन अधिकारी ढोमडे यांनी सभापती -उपसभापती पदासाठी दोन्ही उमेदवाराची निवड अविरोध झाल्याचे घोषित केले. या वेळी सभागृहात सर्वच 18 संचालकाची उपस्थिती होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके हे होते याप्रसंगी माजी आमदार स्व. प्रकाशदादा डहाके यांची धाकटी बहिन सौ.जोतीताई काळे पाटिल संभाजीनगर यांनी स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या कार्याला उजाळा देत स्व.दादांनी स्वतःसाठी व परिवारासाठी काही ही न करता कारंजा (लाड) तालुक्याच्या विकासाकडे भर दिला.
आणि महाराष्ट्रातील निष्कलंक आमदार,कारंजाचे विकास महर्षी म्हणून नावलौकीक प्राप्त केल्याचे सांगितले व स्व.प्रकाश दादांच्या निःस्वार्थ कार्याची आठवण कार्यकर्त्यांना करुन दिली. याप्रसंगी बड़नेरा येथील चंदकान्त पाटिल व जिल्हा परिषद सदस्य आशीष दहातोंडे जिल्हा परिषद सदस्य चंदू डोईफोड़े,समाज कल्याण सभापती अशोक डोगंरदिवे,देवव्रत डहाके, कौस्तुभ डहाके, व सर्व संचालक मंडळ, बाजार समिति सचिव भाकरे यांच्यासह सर्व कर्मचारी हजर होते.सभापती व उपसभापती निवड शांततेत पार पडली.फटाक्याची आतिशबाजी करुन कारंजेकराकडून नवनिर्वाचित संचालकाचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती सईताई डहाके यांच्या पदग्रहणाच्या वेळेस दादांच्या आठवणीने अनेक कार्यकर्त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसून आले.