मुंबई/वाशिम : स्वतःच्या कुटुंबावर,घरादारावर अक्षरशः तुळशीपत्र ठेवून सभोवतालच्या समाजामध्ये,राष्ट्रीय कार्यक्रमाची जनजागृती करणारे आणि अंधश्रद्धा, हुंडाप्रथा,बालविवाह,समाजातील निरक्षरता,भृणहत्या व्यसनाधिनता इत्यादी कुप्रथाचे निर्मूलन व्हावे.लेक वाचली पाहीजे.लेक शिकली पाहिजे. याकरीता रात्रंदिवस आपल्या किर्तन,भारूड,गोंधळ जागरण,पोवाडे, कलापथक,शाहीरी इत्यादी लोककला मधून समाजप्रबोधन करणाऱ्या कलावंताचे वृद्धापकाळी अक्षरशः हाल होत असतात.कारण दारिद्रयावस्थेत असणाऱ्या कलावंताची म्हातारपणी ना उदरनिर्वाहाची सोय असते ना औषधोपचाराची. परंतु महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक विभागामार्फत लोककलावंताकरीता दरमहा वृद्धापकाळ साहित्यीक कलाकार मानधन योजना सुरु केलेली आहे.
परंतु गेल्या 2019 च्या सार्वत्रिक निवडणूका पासून, जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार समिती गठीत करण्यात आली नसल्याने जिल्हयातील हजारो कलाकार मानधन योजनेपासून वंचित राहीले आहेत. त्यामुळे कलावंताचे प्रलंबित अर्ज निकाली काढून त्यांना मानधन सुरू करणे गरजेचे आहे.शिवाय सध्याची महागाई पहाता कलावंताना मिळणारे मानधन तुटपुंजे असून कलावंताना मानधनात वाढ करून,दरमहा किमान पाच हजार रुपये मानधन सुरू होणे गरजेचे आहे.शिवाय गेल्या पाच वर्षापासून समाजसेवकांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार इत्यादीचे पुरस्कार सोहळे झाले नाहीत त्यामुळे या व इतर न्याय्य मागण्यांकरीता,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा (लाड)च्या वतीने, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात दि 24 जानेवारी 2024 रोजी लोककलावंताचे विराट असे, "क्रांतिकारी धरणे आंदोलन" करण्यात आले होते.या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हयातील शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या सक्रिय कार्यकर्त्या तथा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ वैशाली येळणे (मॅडम) यांनी खासदारांच्या आदेशाने,दि 07 फेब्रुवारी 2024 रोजी, मुख्यमंत्री महोदयाचे सचिवालयात स्वतः जाऊन, मुखमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचे सचिव संजय मोरे साहेब यांची भेट घेऊन,त्यांचेकडे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांचे निवेदन सादर करून,लोककलावंताच्या विविध प्रश्नाबाबत त्यांचेशी सविस्तर चर्चा करून त्यांना कलावंताच्या विविध समस्याची जाण करून दिली. त्यावर सचिव संजय मोरे यांनी मुखमंत्री महोदयाशी लोककलावंताच्या समस्यांविषयी माहिती देऊन आपल्या न्यायहक्काच्या मागण्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे प्रयत्न करणार असल्याचे मोरे साहेबांनी जिल्हाध्यक्षा सौ.वैशाली येळणे (मॅडम) यांना सांगीतले.खासदार भावनाताई गवळी आणि जिल्हाध्यक्षा सौ.वैशाली येळणे (मॅडम) यांनी लोककलावंताच्या मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून पाठपुरावा केल्याबद्दल विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.