वाशिम : अनुसूचित जामातीच्या इयत्ता 11 वी व 12 वीत शिक्षण घेत असलेल्या व पुढे व्यावसायीक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव https://etribevalidity.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने समितीला 30 नोव्हेंबरपर्यंत करावे. वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अचूक अर्ज ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल क्रमांक) नमूद करुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. असे आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, यवतमाळचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष यांनी केले असल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.