कारंजा:- (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे .)दिनांक १ मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ वा वर्धापन दिन समारंभ कारंजा तहसील कार्यालयाचे प्रांगणात सकाळी ठीक ८ वाजता मा. आमदार श्री . राजेंद्रजी पाटणी, विधानसभा सदस्य, ३५कारंजा यांचे उपस्थितीत संपन्न होऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार कुणाल झाल्टे, न.प.मुख्याधिकारी दीपक मोरे, उप कार्यकारी अधिकारी सा. बां. शुभम जोशी , पोलीस निरीक्षक धंदर इत्यादी अधिकारी व माजी नगर अध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक, इत्यादी सह अन्य मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते , नागरीक, शालेय विद्यार्थीनी उपस्थित होते. पोलिस कर्मचारी, नायब तहसीलदार हरणे, पाचरणे व ईतर, तहसील कर्मचारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आमदार राजेन्द्र पाटणी यांनी जिल्यातील विकास कामांचा सरकार कडे पाठपुरावा करुन अनेक महत्वपूर्ण योजना आणल्याचे सांगितले. त्या संदर्भात सविस्तर विवेचन केले. शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्रात यामुळे वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार पाटणी यांच्या सोबत भाजपा जैन प्रकोष्ठचे ज्ञायक पाटणी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल कानकिरड, भाजपा तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे, यूवा मोर्चा शहर अध्यक्ष अमोल गढवाले, शहर सरचिटणीस शशी वेळूकर, युवा मोर्चा पदाधिकारी समीर देशपांडे, जगताप सवीज, मोहन पंजवानी मनोज शिवाल,आदीसह अन्य होते. तसेच भाजपा महीला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या सह ईतर महिला वर्ग उपस्थित होता.येथील कार्यक्रमाचे संचलन मुकूंद यांनी केले. असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले आहे.