भामरागड : आज 29 एप्रिल रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र, काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान, अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवर यांनी भामरागड येथील रानटी हत्तीच्या हल्यात मृत्यू पावलेल्या आलाम परिवारास सांत्वन भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.
यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,लक्ष्मीकांत भोगांमी काँग्रेस अध्यक्ष भामरागड,रजनीकांत मोटगरे.अनु जाती सेलचे जिल्हाध्यक्ष,रुपेश टिकले परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष, प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, अशोक येलमुले माजी सरपंच वेलगूर, निषार हखिम काँग्रेस अध्यक्ष अहेरी, अजु पठाण, चंद्रकांत बेजलवार,सुधाकर तिम्मा, सचिन पांचार्या, प्रवीण मोगरकर,नामदेव भांडेकर,चेतन नरोटे,सूरज गोटा,सागर मुंड, देवाजी गोटासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.