जिल्ह्यातील बल्लारपूर जंक्शन येथील दादरा पुलाला अपघात झाला असून, 25 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रवाशांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी दिले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत जवळपास १३ प्रवाशी जखमी झाले असून यातील बहुतांश लोकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बल्लारपूर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ व ४ यांना जोडणारा व साधारण ३० फूट उंच असा हा ओव्हर ब्रीज आहे. साची निलेश पाटील, प्रेम तितरे (४५ वर्ष), चैतन्य मनोज भगत ( वय १८), निधी मनोज भगत, छाया मनोज भगत, नयन बाबाराव भिवनवार, राधेश्याम सिंग, अनुराग खरतड, रिया खरतड, स्विटी खरतड, विक्की जयंत भिमलवार, पूजा सोनटक्के (वय ३७), ओम सोनटक्के. यातील राधेश्याम सिंग यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.
आरोग्य विभागाने तातडीने वैद्यकीय यंत्रणा तैनात करावी अशा सूचना देखील दिलेल्या आहेत. या अपघाताची चौकशी करण्याची मागणी त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केलेली आहे.
अधिक माहितीसाठी आणि उपचारासाठी खासदार बाळू धानोरकर यांचे वैद्यकीय प्रतिनिधी अनिल शीरसगर +919890118371 यांच्याशी संपर्क साधावा. वैद्यकीय उपचाराकरिता संपर्क साधण्याचे आवाहन खासदारानी केले आहे