कारंजा : शरद पोर्णिमा,आश्विन पौर्णिमा ही मुलींच्या भुलाबाईच्या उत्सवाची माडी पोर्णिमा म्हणून विदर्भात साजरी केली जाते. भाद्रपद पोर्णिमा ते आश्विन पोर्णिमा अशा एका महिन्याच्या भुलाबाईच्या उत्सवाची ह्या दिवशी सांगता केली जाते. त्यानिमित्त शरद पोर्णिमेच्या यादिवशी मुली आपल्या घरोघरी चौरंगावर,भुलाबाईना सजवून खोपडीच्या मंदिरसदृश्य छताखाली मांडतात.भुलाबाई करीता सुंदर कपडे,दागीने, फुलांच्या माळा घालून सजवितात.त्यांचे पूजन करतात.नैवेद्य म्हणून गोडाधोडाचे मिष्टान्न, त्यांच्या करीता फळे, सुका मेवा,शेवचिवडा वगैरे 32 प्रकारच्या खाऊची खिरापत केली जाते.
नंतर आनंदोत्साहाने भुलाबाईची गाणी गाऊन, मुलींचे खेळ खेळीत,आरती करतात.एकमेकींना खिरापत वाटतात.शिवाय याच दिवशी कोजागीरी पोर्णिमा सुद्धा केली जाते.त्यामुळे कु.समृद्धी कडोळे, कु संस्कृती कडोळे यांनी आपल्या बालमैत्रिणिंना बोलवून,त्यांच्या सहकार्याने शुक्रवारी दि 27 ऑक्टोबर रोजी भुलाबाईचा उत्सव साजरा केला.