कारंजा येथे 4 व 18 जुलै रोजी आरटिओ शिबीर." वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : तालुकास्तरावर मोटार वाहन चालक/ मालक यांच्या सोयीसाठी मोटार वाहन निरीक्षक यांचा वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी व तपासणी, वाहन चालक व अनुज्ञप्ती चाचणी , परवाना व तपासणी शिबिराचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम यांनी केले आहे. जुलै 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिबीर कामकाजाचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.
जुलै महिन्यात कारंजा येथे 4 व 18 जुलै रोजी, रिसोड येथे 7 जुलै रोजी, मानोरा येथे 11 जुलै रोजी आणि मंगरुळपीर येथे 14 जुलै रोजी. ऑगस्ट महिन्यात कारंजा येथे 3 व 22 ऑगस्ट रोजी, रिसोड येथे 8 ऑगस्ट रोजी, मानोरा येथे 11 ऑगस्ट रोजी आणि मंगरुळपीर येथे 18 ऑगस्ट रोजी, सप्टेंबर महिन्यात कारंजा येथे 5 व 21 सप्टेंबर रोजी, रिसोड येथे 8 सप्टेंबर रोजी, मानोरा येथे 12 सप्टेंबर रोजी व मंगरुळपीर येथे 18 सप्टेंबर रोजी, ऑक्टोबर महिन्यात कारंजा येथे 4 व 20 ऑक्टोबर रोजी, रिसोड येथे 10 ऑक्टोबर रोजी, मानोरा येथे 13 ऑक्टोबर रोजी व मंगरुळपीर येथे 17 ऑक्टोबर रोजी, नोव्हेंबर महिन्यात कारंजा येथे 3 व 21 नोव्हेंबर रोजी, रिसोड येथे 7 नोव्हेंबर रोजी, मानोरा येथे 9 नोव्हेंबर रोजी व मंगरुळपीर येथे 17 नोव्हेंबर रोजी आणि डिसेंबर महिन्यात कारंजा येथे 5 व 20 डिसेंबर रोजी, रिसोड येथे 8 डिसेंबर रोजी, मानोरा येथे 13 डिसेंबर रोजी व मंगरुळपीर येथे 15 डिसेंबर रोजी हे शिबिर आयोजित केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.