अकोला-पत्रकार आणि साहित्यिकांचं कार्य हे समाजासाठी सारखंच असून त्या साहित्यिकांना आणि विविध क्षेत्रातील अग्रेसर लोकांना आपल्यासोबत घेऊन या अनोख्या संगमातून पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातही काम करणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे नाविण्यपूर्ण कार्य अभिनंदनीय आहे.

समाजात उल्लेखनिय काम करणाऱ्या ईतर सेवाव्रतींनाही सन्मानित करून कार्यप्रोत्साहन देण्याची विधायक या कौतुकास्पद आहे .असे मनोगत प्रभात किडस् या प्रथितयश बोर्डींग स्कूल चे संचालक डॉ.श्री.गजाननजी नारे यांनी व्यक्त केले. स्थानिक जठार पेठेतील जैन रेस्ट्रो येथे या पत्रकार महासंघाच्या १६ व्या मासिक विचारमंथन मेळाव्यात संघटनेच्या व्दितीय वार्षिक दिनदर्शिकेच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन त्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.त्यावेळी ते अध्यक्षिय मनोगतातून बोलत होते. अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.संदिपजी घुगे हे ग्रामपंचायत निवडणूकांमुळे व आरोग्य उपसंचालक वारे मॅडम ह्या अधिवेशन पूर्वतयारीच्या अकस्मात मिटींगमुळे उपस्थित नव्हत्या.त्यामुळे गजानननजी नारे यांचे अध्यक्षतेखाली व वाहतुक पोलीस निरीक्षक श्री.विलासजी पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ संपन्न झाला.

प्रसंगी लोकस्वातंत्र्यचे संस्थापक-अध्यक्ष संजय एम देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी सर्वप्रथम सामाजिक कार्याचे अधिष्ठाता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व समाजोध्दारक संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला हारार्पण व वंदन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना वाहतूक पोलिस निरीक्षक श्री विलास पाटील यांनी आत येण्यापूर्वी काही माहिती नव्हती.परंतू लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची शिस्तबध्द वाटचाल ,उद्दिष्ट्ये आणि संकल्पांची माहिती मिळाल्यावर खरोखरच अशा नाविण्यपूर्ण कार्य आणि विचारांची आज सामाजिक गरज असल्याची जाणीव झाल्याची वास्तवता विषद केली.

याप्रसंगी अतिथी आणि आपत्तीग्रस्तांना डी जीवाची पर्वा न करता मदत कार्य करणारे सेवादुत,संकटमोचक गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापन फाऊंडेशनचे असंस्थापक-अध्यक्ष श्री दिपक सदाफळे आणि शेतकरी,श्रमिक आणि आत्महत्त्याग्रस्त कुटूंबांसाठी कार्य करणारे आधार फाउंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष व नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक श्री माणिक शेळके यांचा सन्मानपत्र,शाल व पुष्पवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे कायदेविषयक मार्गदर्शक अॕड.श्री नितीन धुत यांनीही विचार व्यक्त केले.

केंद्रीय पदाधिकारी सौ.जया भारती जिल्हा पदाधिकारी सौ.दिपाली बाहेकर यांच्या संचलनाखाली झालेल्या याकार्यक्रमास केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे,किशोर मानकर,सचिव राजेन्द्र देशमुख,प्रा.डॉ.संतोष,हूशे,अॕड..नितीनजी अग्रवाल, पुष्पराज गावंडे, अंबादास तल्हार, प्रा.राजाभाऊ देशमुख,डॉ.शंकरराव सांगळे,के.व्ही देशमुख,कृष्णा चव्हाण,अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके,बुलढाणा जिल्हाध्यक्ष स्वप्नील देशमुख,मनोज देशमुख,सागर लोडम,मंगेश चऱ्हाटे,राहूल राऊत,सतिश देशमुख,निरज शहा, कृष्णा देशमुख,मनोहर मोहोड,दिलीप नवले,सुरेश कुलकर्णी,अरूण भटकर ,शेगाव,डॉ.नितीन तायडे,सुरेश पाचकवडे,श्याम कुलकर्णी,प्रा.सुहास उगले,प्रा.विनय दांदळे,भास्कर गुरूजी,देवीदास घोरळ,शिवचरण डोंगरे,नरेन्द्र डंबाळे,पंकज देशमुख,थोरात व बहूसंख्य पत्रकार व निमंत्रीत मंडळी उपस्थित होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....