अकोला:- स्थानिक भिरडवाडी स्थित श्री संताजी इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम शनिवार दिनांक 31/08/24 रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व कृष्ण प्रतिमेच्या पूजनाने झाली शाळेचे अध्यक्ष माननीय श्री मंगेशजी वानखडे सर मुख्याध्यापिका कुमारी अश्विनी खोत इन्चार्ज श्री नांदुरकर सर यांनी प्रतिमेचे पूजन केले. दहीहंडी पूजन करण्यात आले .आरती करण्यात आली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना गोपालकाल्याचे प्रसाद रूपाने वाटप करण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये वर्ग पाचवीचा आर्थिक मालोकार याने कृष्णाची भूमिका केली तसेच आरुषी मालोकार, आचल नेवारे, रेणुका देशमुख, केतकी मोकळकर, भूमि तिहीले, वेदिका इंगळकर, श्रावणी अंबाळकर, सेजल मोरे, प्रतीक्षा लेखनार, वैष्णवी गेंदे यांनी गोपगोपिकांच्या भूमिका सादर केल्या त्यानंतर वर्ग आठवी व वर्ग सहावीच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली आणि कार्यक्रमाला आनंदाचे उधान आले कार्यक्रमाचे संचालन अश्विनी राजे मॅडम यांनी केले तर अपर्णा देशमुख मॅडम यांनी कृष्णाच्या जन्म कथा सांगितल्या उगले मॅडम यांनी भजन सादर केली तर बहुरूपी मॅडम, श्वेता जोशी मॅडम, ढोकणे मॅडम, भगत मॅडम, टाले मॅडम, सोनवणे मॅडम, भाकरे मॅडम, वाडेकर सर, चौधरी सर ,कुलकर्णी मॅडम, कांबळे मॅडम यांनी कार्यक्रम शिस्तीत पार पाडला. शाळेचे गोडवे काका ,महेश दादा, ज्योतीताई ,अनुराधाताई यांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यात मदत केली. कार्यक्रमाला ज्योती फंदाट मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.