अकोला- पाटील समाज वर-वधू सूचक केंद्र द्वारा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या मेळाव्याच्या नियोजनासाठी रविवार दि. 1 डिसेंबर रोजी उमरी परिसरात बैठक पार पडली.
येत्या जानेवारी महिन्यामध्ये पाटील समाज वर-वधू सुचक केंद्र द्वारा समाजातील उपवर-वधूंच्या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी सर्वतोपरी तयारी केली जात आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून पाटील समाजातील जास्तीत जास्त उपवर-वधू व पालकांनी सहभागी व्हावे यासाठी या मेळाव्याचा प्रचार व प्रसार केला जात आहे. तसेच मेळावा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावा, या मेळाव्याच्या माध्यमातून उपवर-वधूंना योग्य जोडीदार मिळून उपवर-वधूंची सोयरीक जुळावी तसेच गरीब पालकांच्या मुलींचे विवाह आदर्श पद्धतीने व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या सर्व नियोजनासाठी मंडळाद्वारा दर रविवारी बैठक घेतली जाते. 1 डिसेंबर रोजी उमरी येथील शोभा मंगलम येथे बैठक पार पडल