डी वाय पाटील विद्यापीठ, अंबी, तळेगाव दाभाडे येथील मोरेश मधुकर मुखेडकर यांनी पी.एच.डी कार्यक्रम यशस्वी रित्या पूर्ण केला
मुंबई विद्यापीठाने "इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग" मधील रीसर्च स्कॉलर मुखेडकर मोरेश मधुकर यांना डॉक्टरेट बहाल करण्यात आली आहे. त्यांनी "वायरलेस ऑड-हॅक नेटवर्क साठी प्रगत एजरक्रप्शन स्टँडर्ड चा वापर करून रिअल टाईम आणि नाॅन रिअल टाईम सिक्युरिटी अल्गोरिदम चा विकास" या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली आहे.
डी वाय पाटील अकादमी चे रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नेरूळ, नवी मुंबई हे त्यांचे संशोधन केंद्र होते.
मोरेश मुखेडकर यांनी ए.पी.शहा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ठाणे, मुंबई येथील प्राचार्य डॉ. उत्तम डी. कोळेकर यांच्या देखरेखेखाली पी.एच.डी. मुंबई विद्यापीठांतर्गत पूर्ण केली आहे., संचालक, परिक्षा मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ यांनी पीएचडी कार्यक्रम यशस्वी रित्या पूर्ण केल्याबद्दल अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मुखेडकर यांच्या या यशाबद्दल डी वाय पाटील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डी वाय पाटील, अध्यक्ष विजय डी पाटील, उप कुलगुरु डॉ. सायली गनकर, प्रशासकीय अधिकारी गायकवाड सर, प्रमुख वित्त अधिकारी शिवराज उगले, रजिस्ट्रार अशोक पाटील, सा. रजिस्ट्रार राजेंद्र पाटील, डीन डाॅ. फुलंबरकर, प्राचार्य डॉ शास्त्री तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन विशेष सत्कार केला.