कारंजा :- दि. २५/११/२०२३ रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार माननीय राजेंद्र पाटणी साहेब यांच्या शुभहस्ते कारंजा तालुक्यातीलअंदाजित किंमत १२ कोटी ०४ लक्ष रुपये असलेल्या विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम उपविभाग, कारंजा अंतर्गत राज्याच्या जुलै २०२२ व मार्च २०२३ मधील अर्थसंकल्प यात मंजूर कामांचे भूमिपूजन मा.राजेंद्र पाटणी शुभहस्ते होत आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. राजीव काळे भा. ज. पा. तालुका अध्यक्ष, कारंजा आणि प्रमुख अतिथी जोशी सा. बा. विभाग कारंजा,जि. प.सदस्या सौ. सुनीताताई नाखले, पंचायत समिति सदस्य दिनेश वाडेकर, शुभम बोनके, सौ. वैशाली विजय काळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत खालील कामांचे भूमिपूजन संपन्न होत आहे. बेलखेड येथे सकाळी ९.३० वा अंदाजित किंमत वाशिम जिल्ह्यातील पिंप्री मोडक कामठा म्हसला बोरगांव ते जिल्हा सिमा रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा २८ कि.मी. ५/५०० ते ७/१०० ता. कारंजा अंदाजित किंमत ७२.०० लक्ष रुपये ,शहा येथे सकाळी १०.१५ वाजता वाशिम जिल्ह्यातील कामरगांव-उंद्री- बांबर्डा -शहा - कारंजा रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा २८ कि.मी. ५/५०० ते ७/१०० ता. कारंजा अंदाजित किंमत १३५.०० लक्ष रुपये प्रजिमा ३५ कि.मी. १२/०० ते १५/००० ता. कारंजा या कामाचे,अलिमर्दापूर येथे ११.०० वा वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ते अलिमर्दापूर रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे. प्रा. आ. ८८ कि.मी. ००/०० ते ००/५०० ता. कारंजा अंदाजित किंमत ३८.०० लक्ष रुपये,मनभा येथे सकाळी ११.४५ वा.वाशिम जिल्ह्यातील कामरगांव-लाडेगांव पिंप्री मोडक भामदेवी - धोत्रा - वाढोणा - दोनद मनभा पिलखेडा उंबर्डा बाजार सोमठाना या रस्त्याची सुधारणा करणे अंदाजित किंमत ५००.०० लक्ष रुपये प्रजिमा २६ कि.मी. ६/०० ते १०/००, १८/०० ते २०/०० च २४/०० ते २८/०० ता. कारंजा या कामाचे,उंबर्डा बाजार येथे दुपारी १२.३० वा .वाशिम जिल्ह्यातील कारंजा जांब वहितखेडा उंबर्डा बाजार ते जिल्हा सिमा रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा ३६ कि.मी. ५/०० ते १०/२०० ता. कारंजा अंदाजित किंमत २३४.०० लक्ष रुपये या कामाचे, धामणी खडी येथे दुपारी ०१.१५ वा.वाशिम जिल्ह्यातील चहेल गिंभा धामणी खड़ी - पसरणी - कारंजा स्स्स्याची सुधारणा करणे. प्रजिमा ४४ कि.मी. १२/०० ते १७/०० ता.कारंजा अंदाजित किंमत २२५.०० लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन संपन्न होत आहे. तरी भूमिपूजन कार्यक्रमास नागरीकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असेआवाहन सरपंच, उपसरपंच ग्रा.पं. सदस्य बेलखेड, शहा, अलिमर्दापूर, मनभा, उंबर्डा (बाजार), धामणी खडी ता. कांरजा यांनी केले आहे. कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन करण्यात आल्याचे वृत्त संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे स्वीय सहाय्यक यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेला पाठविल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे.