कारंजा (लाड) : शिवसेनेच्या पहिल्या फळीतील वरिष्ठ नेत्या, अपराजित खासदार तथा विधान परिषद आमदार भावनाताई गवळी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त,कारंजा तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रम करण्यात आले. त्यावेळी सर्वप्रथम वृक्षारोपण करण्यात आले.व कारंजा येथील वृद्धाश्रम येथे जाऊन गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. तसेच अल्पोहार देण्यात आला. त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे,वृद्धाश्रम अध्यक्ष पुजाताई राठोड,उप तालुका प्रमुख सुरेश पाटील तूरक,सरपंच अरुण भाऊ चव्हाण,सरपंच अमोल पाटील भिंगारे,सरपंच प्रमोद भाऊ साटोटे,विजय पाटील लांडकर, संदीप पाटील लाहे,अक्षय पाटील ,मनोज मांगुळकर ,संजय पाटील शिंदे ,कारंजा मानोरा युवासेना प्रमुख चैतन्य वक्ते,कारंजा मानोरा वैद्यकीय प्रमुख शुभम भोयर,युवा सेना शहर प्रमुख अजय भाऊ मते ,सोशल मीडिया प्रमुख सौरभ इंदाने,राजेश पाटील कडू ,अमोल भाऊ उगले, रिठे पाटील ,सागर मुंदे,प्रदीप लडे व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.