अकोला:-
उत्तम व्यक्ती असला तर समाजाचे आरोग्य सुदृढ राहते अशाच व्यक्ती समाजात सकारात्मक विचाराची पेरणी करतात अशा भावना माझी राज्यमंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी व्यक्त केल्या, अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृहात आयोजित राजर्षी शाहू महाराज कारे गौरव पुरस्कार सोहळ्यात ते अध्यक्ष या नात्याने बोलत होते,
व्यासपीठावर मुंबईतील सर जेजे रुग्णालयाचे उप अधिष्ठाता ड पटेल डॉक्टर श्रीकांत काळे डॉ अशोक ओळंबे व श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ अंबादास कुलट हे उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन प्रणाम कर्तुत्वाला कारे गौरव समितीचे अध्यक्ष माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, निमंत्रक माजी आमदार तुकाराम बिडकर व स्वागताध्यक्ष संजय चौधरी यांनी केले होते,
यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सर्वश्री माजी आमदार लक्ष्मण रावजी तायडे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी तज्ञ सदस्य संजय खडक्कार, रुग्णसेवेसाठी पराग गवई, कोरोना दूते जावेद झाकरिया व समाजसेवक पुरुषोत्तम शिंदे तसेच रुग्णसेवेसाठी विशेष पुरस्कार म्हणून डॉ पूजा रमाकांत खेतान यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला,
यावेळी डॉक्टर सादिक पटेल लक्ष्मण रावजी तायडे प्राध्यापक तुकाराम बिरकड व स्वागताध्यक्ष संजय चौधरी यांनी आपले विचार व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी केले तर सूत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे दिलीप रावासरे गणेश राव पोटे अनिल गासे दिवाकर गावंडे कमलेश गावंडे अतुल जवंजाळ महादेव मेहंगे व योगेश वडकर गुरुजी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली
या कार्यक्रमासाठी सर्व क्षेत्रातील विविध मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....