वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे.) : वाशिम जिल्हा निर्मितीला 25 वर्ष उलटून गेल्यानंतरही, दुदैवाने वाशिम जिल्हा समृद्धी व विकासापासून वंचितच राहीला आहे. त्यामुळे विकासापासून उपेक्षित व आकांक्षित असलेल्या वाशिम जिल्ह्याला स्वतःच्या जिल्ह्यातील स्थानिक आमदाराचा मंत्रीमंडळात समावेश करून स्थानिक मंत्र्यांकडे,पालकमंत्री पद मिळणे आवश्यक आहे. त्याकरीता कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे ज्येष्ठ व अनुभवी आमदार राजेंद्र पाटणी यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात येऊन त्यांचेकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्याची मागणी अनेकवेळा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांचे वतीने अध्यक्ष संजय कडोळे (पत्रकार ) यांनी लावून धरलेली आहे. सध्या वाशिम जिल्ह्याचा सांभाळ करणारा पालकमंत्रीच नसल्यामुळे,यंदा दि 15 ऑगष्ट रोजी होणाऱ्या शासकिय ध्वजारोहणा करीता प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील हे भारतीय स्वातंत्र्याच्या 76 वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:05 वाजता प्रशासकीय इमारत,जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहून ध्वजारोहण करतील.असे शासनाकडून कळविण्यात आले आहे.