दि ०६.०६.२४ गुरुवार
शनि जयंती निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे,त्यामध्ये शनि जयंतीच्या पूर्व संध्येला म्हणजे दि ०५.०६.२४ बुधवार ला रात्री ठिक ०९ वा..श्री अष्टविनायक गुरुदेव भजनी मंडळ कारंजा यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. दि.०६ ला सकाळी तेलाभिषेक व सायंकाळी ०७ वा..महाआरती होईल.तरी सर्व भाविक भक्तांनी शनिदेव दर्शनाचा लाभ घ्यावा.
मागच्या वर्षी दि 17 जानेवारी 23 ला शनि देवाचा स्वतःचेच मकर राशीतून स्वतःची मुळत्रिकोन कुंभ या राशीत प्रवेश झाला आहे.मार्च २५ पर्यंत शनि देव कुंभ रशितच राहणार आहेत.
शनीची साडेसाती व गैरसमज
मेष लग्न कुंडली अर्थात कालपूरूष कुंडली नुसार शनि देव दशमेश (कर्मभाव) व एकादशेश (लाभभाव)या दोन भावांचे स्वामी असतात.कर्म व त्या कर्माचे फळ या दोन्हींचे कारकत्व शनि देवाकडे असल्यामुळे शनि देवाला कर्मफळदाता असे संबोधल्या जाते.अमुक व्यक्तीच्या जन्म राशीच्या आधल्या राशीमध्ये जेंव्हा शनि देव प्रवेश करतात तेंव्हा त्या राशीला साडेसाती सुरू होते.उदा:.. मीन राशीच्या आधीच्या कुंभ राशीत शनि देवाचा प्रवेश दि 17 जानेवारीला होत असल्यामुळे मीन राशीला लागती साडेसाती सुरू होत आहे. धनू राशीची साडेसाती संपत आहे,कुंभ राशीला पोटी व मकरला निघती साडेसाती राहील.
जातकाला त्याने केलेल्या बऱ्यावाईट कर्माचे भोग भोगायचा साडेसात वर्षाचा कालावधी म्हणजे साडेसाती.जातकाचे कर्म आणि त्याच्या कुंडलीतील शनि देवाची स्थिती यावर त्या जातकाला साडेसातीमध्ये मिळणारे शुभाशुभ फळ अवलंबून असते.
कर्माचे बाबतीत लिहायचे झाल्यास जातक प्रामाणिक,सात्विक,परोपकारी व चारित्र्य संपन्न असेल तर त्याला साडेसाती मध्ये सुद्धा तितकासा त्रास होत नाही.या उलट जातक अप्रामाणिक,निष्ठुर व चारित्र्यहीन असेल तर जातकाला विशेषतः हे भोग साडेसातीच्या काळामध्ये भोगावेच लागतात.
जातकाचे कुंडली संदर्भात लिहायचे झाल्यास
वृषभ,मिथुन,कन्या, तूळ,मकर व कुंभ या लग्णकुंडलीमध्ये शनि योगकारक असून शनि कुंडलीमध्ये केंद्रत्रिकोणामध्ये असेल तर जातकाला साडेसातीमध्ये फारसा त्रास न होता कधी कधी अकस्मात फायदाही होतो.या उलट कर्क व सिंह लग्नामध्ये शनि मारक बनतो,या लग्नांमधील शनि केंद्र त्रिकोनामध्ये,स्वगृही किंवा उच्चीचा असेल तर ठीक मात्र तो शनि त्रिक भावामध्ये गेला असेल तर अशा जातकाला साडेसातीमध्ये त्रास होतो.
दोन वेगवगळ्या जातकाची सारखीच जन्मनावे असून त्यांची जन्मराशी एकच असेल तरीही साडेसातीमध्ये वेगेवेगळी फळे मिळतात.उदा: .. जन्मनाव संजय असलेल्या दोन व्यक्ती आहेत दोघांचीही कुंभ ही एकच रास असल्यामुळे दोघांनाही साडेसाती आहे हे निश्चित असले तरीही दोघांची कर्म वेगवेगळी आहेत आणि दोघांच्या कुंडलीमध्ये शनीची स्थिती वेगवेगळी असल्यामुळे दोघांचे नाव एकच असूनही त्यांना साडेसातीमध्ये वेगवेगळी फळे मिळतात.असे नसते तर भूवरील प्रत्येक नरेंद्र नावाचा व्यक्ती नरेंद्र मोदींसारखा लोकप्रिय झाला असता आणि प्रत्येक लता नावाची स्त्री लता दीदी सारखीच मंजुळ गायली असती.
साडेसातीमध्ये जातकाने करावयाचे उपाय
शनिदेव कर्मफळ देणारी देवता असल्यामुळे जातकाने आपले आचरण शुद्ध ठेवावे, गरजुला मदत करावी व खोटी कामे करू नये..
तेलाभिषेक,पूजा अर्चा करून शनि देवाला शरण जावे.
शब्दांकन:- संजय दंडे महाराज
शनि मंदिर,कारंजा
मो.9423128795
शीघ्र कवी,लेखक आणि
(Astrologer) ज्योतिष्यकार(पत्रिका पाहण्यासाठी भेटा)
आपल्या प्रतिक्रिया द्या....