वाशिम : भारत जोडो अभियाना अंतर्गत, कन्हेरगाव नाका येथील, रांजगाव स्थित, राष्ट्रिय काँग्रेसच्या क्रमांक तिन च्या शिबीराजवळ उभारलेल्या, लाल किल्ल्याच्या प्रतिकृती जवळ खा राहुल गांधी यांच्या स्वागत शिबीरा जवळ, माजी राज्यमंत्री तथा तिवसा विधानसभेच्या लोकप्रिय आमदार ऍड. यशोमती ठाकुर यांच्या सोबत, विदर्भ लोककलावंत संघटना तथा महाराष्ट्र दिव्यांग संस्था कारंजाचे संस्थापक अध्यक्ष-महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे तथा ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते आणि काळी खेर्डाचे माजी सरपंच प्रदिप वानखडे यांनी भटक्या विमुक्त समाजातील गोंधळी-नाथ- बहुरूपी-मसानजोगी-डोंबारी-कोलाटी लोककलावंताच्या वृद्ध साहित्यिक कलाकार मानधना वाढी बाबत आणि दिव्यांगाच्या अर्थसहाय्यात दुपट्टीने वाढ करण्या बाबत तुम्ही नागपूर येथे होऊ घातलेल्या,
येत्या हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव सादर करून, आमची मागणी विद्यमान शिंदे-फडणविस सरकार कडे रेटून, पूर्ण करून घ्या अशी त्यांना गळ घातली. यावेळी श्री गुरुकुंज सेवाश्रम मोझरीचे सर्व गुरुदेव प्रेमी, भटक्या विमुक्त समाजाचे लोककलावंत तथा अमरावती महानगर पालिकेचे माजी महापौर उपस्थित होते. याप्रसंगी मी लोककलावंताच्या मानधन वाढीबाबत आणि दिव्यांगाच्या संजय गांधी दिव्यांग योजनेचे अर्थ सहाय्य निश्चितच दुप्पटीने वाढवून घेण्याची सरकारकडे मागणी करणार असल्याचे आश्वासन आ. ऍड. यशोमती ठाकुर यांनी, दिव्यांगाचे आणि लोककलावंताचे नेते संजय कडोळे तथा प्रदिप वानखडे यांना दिले आहे.