आनंद सरोवर,माऊंट आबू : "स्वस्थ आणि सुखी समाजा करीता आध्यात्मिक सशक्तीकरण पत्रकाराची भूमिका" या विषयावर दि .26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंमेलनानिमित्त दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी प्रमुख उपस्थितीत असलेल्या मार्गदर्शिका ब्रम्हकुमारी डॉ मोहिनी दिदी, ब्रम्हकुमार भ्राता आतम प्रकाशजी, ब्रम्हकुमारी डॉ नलिनी दिदी,आंतरराष्ट्रीय गायक ब्रम्हकुमार भ्राता निकुंजजी, ब्रम्हकुमार सतिशजी, ब्रम्हकुमारी डॉ सविता दिदी, ब्रम्हकुमार भ्राता युगरतन, ब्रम्हकुमारी निकिता दिदी इत्यादीच्या मार्गदर्शनात, पत्रकारांचा स्वागत समारोह संपन्न झाला.यावेळी आग्रा येथून आलेल्या ब्रम्हकुमारी काजल दिदी यांच्या स्वागत नृत्याने पत्रकाराचे भावनिक स्वागत करण्यात आले.तर ब्रम्ह कुमार भ्राता निकुंज यांनी आपल्या अमृतमय वाणीमधून, "माऊंट आबू यह धरा परमात्मा का सृष्टी का चमत्कार है । यह कौन चित्रकार है ।" या सुमधूरगीताने प्रजापिता ब्रम्हकुमारीज विश्वविद्यालयाची ओळख पत्रकारांना पटवून दिली. यावेळी सर्वप्रथम ब्रम्हांडातील परमात्म्याची रचना असलेली सृष्टी (पृथ्वी), जिवनावश्यक प्राणवायु ( ऑक्सीजन),जल (पाणी),अग्नी (सूर्य) यांचा मानवाने चालविलेला ऱ्हास थांबवीला पाहिजे.हे मानवाच्या लक्षात आणून देणारी चित्रफित दाखविण्यात आली.त्याद्वारे पत्रकारांना पर्यावरणाकरीता आपल्या लेखनामधून लिखान करून शांती,सत्य,अहिंसा,न्यायाने समाजात जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आनंदसरोवर येथे पत्रकारांच्या महासंमेलनानिमित्त नवनिर्मित आनंद सरोवर या स्थळावर पहिल्यांदा पत्रकारांच्या मार्गदर्शना निमित्त थेट न्यूयार्क (अमेरिका) येथून आलेल्या हेड ऑफ चिफ ब्रम्हकुमारीजच्या राजयोगीनी ब्रम्हकुमारी मोहिनी दिदी यांनी आपल्या अध्यक्षीय संभाषणा मधून बोलतांना सांगीतले, "समाज परिवर्तनाकरीता, शांती-संयम - स्वस्थ आणि सुखी समाज आध्यात्मिक सशक्तिकरणाकरीता पत्रकाराची भूमिका मोलाची असून,पत्रकारांच्या व्यस्त दिनचर्येमधून शांत व समाधानी होण्याकरीता शिवबाबांनीच त्यांना येथे बोलवीले आहे. ते त्यांच्या बाबांच्या घरी आले असून येथून समाजाच्या स्वस्थ सुखी जीवनाचा संदेश घेऊन जाणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्र संचालन ब्रम्हकुमारी चंदा दिदी यांनी केले.

यावेळी संपूर्ण भारतभरातून आलेल्या पत्रकारांसह नेपाळ,महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, दिल्ली, हरियाणा, गुजरात, राजस्थान येथून आलेल्या पत्रकारा सोबत,वाशिम जिल्हातील कारंजा (लाड) येथील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय केन्द्राच्या संचालिका राजयोगीनी मालती दिदी यांच्या मार्गदर्शनात आनंद सरोवर माऊंट आबू येथे गाईड अशोकरावजी उपाध्ये पत्रकार यांच्या नेतृत्वात आलेल्या महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, लोमेश पाटील चौधरी,विजय खंडार, सुधाकर इंगोले, ओमप्रकाश गुप्ता, संतोष अग्रवाल,गजानन हरणे, संजय गावंडे,शंकरराव पुंड इत्यादी पत्रकार मंडळींन महासंमेलनात सहभागी झाले होते. सर्व पत्रकार बांधवाना बॅग, डायरी, पेन आणि श्रीलक्ष्मी नारायणाची अप्रतिम अशी प्रतिमा देवून गौरविण्यात आले असे वृत्त आमचे वाशिम येथील ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....