जगप्रसिद्ध समाजसेविका, नोबेल शांतता पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार प्राप्त असलेल्या स्व.मदर तेरेसा यांची जयंती दि.26/08/2023 रोजी साजरी करण्यात आली. ह्याच दिवशी, उत्तरप्रदेश राज्यातील "शांती फाउंडेशन- गोंडा" मार्फत शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, क्रीडा अश्या विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या भारतातील फक्त 50 मान्यवरांना सन्मानित करण्यात आले..त्यात, सामाजिक क्षेत्र श्रेणीमधून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे रहिवासी युवा समाजसेवक श्री.उदयकुमार सुरेश पगाडे यांना सन्मानित करण्यात आले. काही कारणास्तव यांना पुरस्कार सोहळ्याला हजर राहता आले नाही.. पण, सदर संस्थेने ऑनलाइन सर्टिफिकेट ई-मेल द्वारे पाठवून सन्मानित केले. आणि उर्वरित ट्रॉफी, मेडल व फ्रेमिंग सन्मानपत्र, मानाचा फेटा ह्यासर्व गोष्टी टपालद्वारे यांना पाठविण्यात येणार आहे.. गेल्या 8 वर्षांपासून, पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अनेक समाजपयोगी कार्य करत श्री.उदयकुमार पगाडे यांनी विविध ठिकाणी आपला ठसा उमठवीला आहे.
या आधीसुद्धा, उदयकुमार पगाडे यांना विविध देश विदेशातील नावाजलेल्या संस्थेने सन्मानित केले आहे.. "माझी माती - माझा देश अभियान" अंतर्गत 2023 ह्यावर्षी नगर परिषद- ब्रम्हपुरीने यांची विशेष निवड करत Brand Ambassador / राजदूत म्हणून निवड करून सन्मानित केले आहे.. जवळपास 500 पेक्षा जास्त आजपर्यंत यांना देश विदेशातील विविध नावाजलेल्या संस्थेने सन्मानित केले आहे..