मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख विठ्ठलभाऊ लोखंडकर तथा वाशिम जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किडसे यांच्या मार्गदर्शनात, मनसेची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकी मध्ये कारंजा शहरातील विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.तसेच तालुक्यातील व शहरातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी मनसे विद्यार्थीसेनेकडून अनेक युवकांचा मनसे प्रवेश सुद्धा घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू पाटील,जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर,वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे,कृषी सेना जिल्हा अध्यक्ष विठ्ठलभाऊ राठोड,मनविसे जिल्हा अध्यक्ष नितीन शिवलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीला प्रमुख उपस्थितीमध्ये शहर अध्यक्ष हरीश हेडा,शहर सचिव कपिल महाजन,माणिक राठोड संतोष ढाकुलकर,उमेश टोलमारे रजकिरण कांबळे,विकास दाभाडे,गजानन कडणे हे उपस्थित होते.तसेच विक्की सारवान अनिकेत नरवाले, स्वराज मस्के,प्रसाद कुटे,समीर देशमुख,चंदू वाघमोडे,अभी संपळे,अमोल चौधरी सह अनेक अधिकृत पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. असे वृत्त मनसेकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाले असल्याचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.