ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 5 कोटी 16 लाख रुपयांच्या विकासकामांचे भुमीपुजन व लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला आहे.
मेंडकी हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असल्याने गावात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून "जलजीवन मिशन" अंतर्गत सुमारे ५ कोटी रुपयांची वाढिव नळपाणी पुरवठा मंजूर करण्यात आली असुन सदर योजनेचे भूमिपूजन व गावातील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी खनिज विकास निधीतून १६ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या आरोचे लोकार्पण, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या बांधकामाचे भुमिपुजन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.