:-अनेक वर्षापासून आध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणारे ज्येष्ठ समाजसेवक ,ह भ प ,प्रवचनकार हिंदू रत्न डॉ.रवींद्र जी भोळे यांना नुकताच दिल्ली येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच च्या वतीने श्रीकृष्ण प्रणामी मंदिर रोहिणी सेक्टर येथे हिंदू रत्न उपाधी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. रवींद्र भोळे यांनी प्रवचनाद्वारे प्रबोधन कार्य ,व्यसनमुक्ती तसेच जनजागृतीचे कार्य केलेले आहे. प्रवचनाद्वारे हिंदू संस्कृतीचा प्रसार व प्रचाराचे महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. गावोगावी ग्रामीण भागात अखंड हरिनाम सप्ताह मध्ये त्यांनी वारकऱ्यांची सेवा व प्रवचनाद्वारे प्रबोधन, आरोग्य विषयक जनजागृती, महीला सबलीकरण कार्यक्रम , राष्ट्रीय एकात्मता , नवराष्ट्र निर्मितीसाठी विविध कार्यक्रम घेतलेले आहेत . उपक्रम राबविले आहेत. याशिवाय सामाजिक, धार्मिक ,अध्यात्मिक ,शैक्षणिक अपंग सेवा, वृक्षारोपण ,नैसर्गिक आपत्ती ,तसेच कोरोना पेंडोमिक इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्याबद्दल त्यांना दिल्ली येथील हिंदू रत्न पुरस्कार मिळाला. हा राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार हिंदू रत्न उपाधी मिळाल्याबद्दल गुरुवर्य तात्या राम महाराज सोनारी गादी यांचे परम शिष्य भैरवनाथ भक्त नाथपंथी मोहनजी शिंदे महाराज यांनी डॉ.रवींद्र जी भोळे महाराजांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. याप्रसंगी भैरवनाथ दत्त नाथपंथी मोहनजी शिंदे महाराज आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की डॉ. रवींद्र भोळे ही समर्पित भावनेने निरपेक्षपणे कार्य करणारे निष्काम कर्मयोगी आहे. राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी राष्ट्रभक्त निर्माण करण्यासाठी ते अखंड कार्यक्रम करीत आहेत. मॅगसेस विनर पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई यांची समवेत त्यांनी मराठवाडा भूकंपातही कार्य केलेले आहे. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक बाळासाहेब देवरस यांना भेटण्याचा योगही आला होता. तसेच डॉक्टर रवींद्र जी भोळे यांच्या जीवनावर पारधी समाजातील लेखक ऑस्कर भोसले यांनी वाळवंटातील समाजसेवी सरोवर हे चरित्रात्मक पुस्तक लिहिलेले ह्या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाले होते.अशा महान व्यक्तिमत्त्वाला हिंदू रत्न उपाधी मिळाल्यामुळे डॉ.रवींद्र जी भोळे यांचा सन्मान केल्यामुळे मला धन्यता वाटत आहे.