अकोला :
आईवडील मानसिक आजारी असल्याने घरात राहण्याची कोणतीही सोय नाही. घरातून हाकलले गेलेले,शिक्षणासाठी धडपडणाऱ्या कोमल संजीव प्रधान या मुलीची कहाणी काळजाला चटका लावणारी आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील सिद्धार्थ नगर येथे राहणारी कोमल सध्या अकोलामध्ये बेघर स्थितीत शिक्षणासाठी झगडते आहे.
कोमल बी.ए. (द्वितीय वर्ष, चौथा सत्र) मध्ये शिक्षण घेत आहे. तीने H.S.C. मध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. मात्र घरच्या परिस्थितीमुळे आणि मानसिक आजारी असलेल्या आईवडिलांच्या त्रासामुळे तिला घरात राहण्याची संधी मिळाली नाही. कोमलच्या म्हणण्यानुसार, "आई-वडील मला विनाकारण शिवीगाळ करतात, मारहाण करतात. त्यांच्याकडे राहणे अशक्य झाले आहे."
परिक्षा जवळ आल्याने तिने अकोल्यामधील मलकापूर येथील कला महाविद्यालयात तात्पुरती नोंदणी केली आहे. मात्र इथे देखील तिच्या राहण्याची कोणतीही सोय नाही. कोमल सध्या पूर्णपणे निराधार स्थितीत आहे. तिच्या कडून ना कुठले अपराध झाले आहेत, ना कोणाला त्रास दिला आहे – फक्त शिकायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, एवढंच तिचं स्वप्न आहे.
कोमलची ही व्यथा आपल्या समाजाच्या मनाला हादरवणारी आहे. एका हुशार, समंजस, आणि आत्मनिर्भर होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या मुलीला जर आपल्या समाजाने हात देत मदतीचा आधार दिला, तर ती तिचं स्वप्न पूर्ण करू शकेल.
या घटनेची तातडीने दखल घेऊन – सामाजिक संस्था, शासकीय यंत्रणा, महिला व बालकल्याण विभाग, उच्च शिक्षण संस्था, आणि सर्व संवेदनशील नागरिकांनी या विद्यार्थिनीला शिक्षणासाठी आवश्यक असणारी राहण्याची व आर्थिक मदत व्हावी यासाठी पुढे यावे, ही विनंती.
कोमल प्रधान यांच्याशी संपर्कासाठी:
फोन नं.: 9763401515
पत्ता: रा. सिद्धार्थ नगर, पूर्णा, ता. पूर्णा, जि. परभणी – ४३१५११, मराठवाडा.
आपल्या प्रतिक्रिया द्या....