कारंजा : कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या लाडक्या महिला आमदार माईसाहेब सईताई डहाके यांनी आपले संपूर्ण लक्ष्य आकांक्षित मतदार संघाच्या विकासाकडे वळवीले असून त्यांनी मंत्रालयामधून मतदार संघाकरीता अनेक विकासकामांना मंजूरी मिळविल्याचे प्राथमिक वृत्त नुकतेच,करंजमहात्म्य न्यूज नेटवर्क्सला मिळाले आहे. सईताई डहाके यांची विधानसभेत निवडून जाण्याची पहिलीच वेळ असली तरीही गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कार्याची कार्याची कार्यशैली निश्चितच प्रशसंनिय अशी राहीली आहे.विधानसभेत, मंत्रालयात,नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सईताई डहाके ह्या विकास कामांकरीता खंबिरतेने मतदार संघाच्या समस्या व अडचणी मांडून विकास कामे खेचून आणत आहेत.नुकतेच त्यांनी मतदार संघाच्या प्रलंबित कामांची यादीच मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस यांना देवून,सर्वच प्रलंबीत विकासकामाच्या मंजूरी करीता मुख्यमंत्र्याना गळ घातली आहे. असो,त्यांच्या अथक प्रयत्नातून, जिल्हा नियोजन समिती वाशिम अंतर्गत कारंजा नगर पालिका हद्दीतील ७ कोटी रुपयांच्या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा, त्यांच्या हस्ते रविवार दि.०८ जून २०२५ रोजी,कार्यक्रमाचे अध्यक्ष :- मा.नरेंद्रजी गोलेछा मा.नगराध्यक्ष न.प. कारंजा यांच्या अध्यक्षतेखाली,आणि मा.दत्तराजजी डहाके,मा.नगराध्यक्ष न.प.अध्यक्ष, कारंजा ; प्रमुख अतिथी सौ.प्राजक्ताताई माहितकर,शहराध्यक्ष,भाजपा कारंजा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून,त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील १)लक्ष्मी नगर मधील संतोष ढाकूलकर घर ते गजानन पवार घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे.अंदाजपत्रकीय किंमत :- ४२,३७,४६६ (लक्ष) वेळ :- सकाळी ९:०० वाजता २).सुपलदास नगर मधील गुळदे घर ते देवळे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे.अंदाजपत्रकीय किंमत :- ६१,१९,३६५ (लक्ष) वेळ :- सकाळी ९:३० वाजता ३).रमाबाई कॉलनी मधील गजानन काजळे घर ते सावंत घर ते दिलीप चव्हाण यांचे घारापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे.अंदाजपत्रकीय किंमत :-५८,०३,४४६ (लक्ष)
वेळ :- सकाळी १०:०० वाजता ४).कारंजा जि. वाशिम दत्त कॉलनी येथील देशमुख घर ते अॅड. खंडागळे ते बन्सोड न.प. कॉलनी येथे काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.अंदाजपत्रकीयकिंमत :-४९,४६,८९० (लक्ष)
वेळ :- सकाळी १०:३० वाजता
५).कारंजा जि. वाशिम महावीर कॉलनी मुर्तीजापूर टोड येथील कथे ते बोरकर यांचे घरापर्यंत काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.अंदाजपत्रकीय किंमत :-४८,१३,६२३ (लक्ष)
वेळ :- सकाळी १०:४५ वाजता
६).कारंजा जि. वाशिम महावीर कॉलनी येथील ताठे घट ते डॉ. ठाकरे यांचे घरापर्यंत कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
अंजदाजपत्रकीय किंमत :-३२,८९,४८०* (लक्ष)
वेळ :- सकाळी ११:०० वाजता
७).कारंजा जि. वाशिम महावीर कॉलनी येथील मूंदे घर ते अवघन यांचे घरापर्यंत कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.अंदाजपत्रकीय किंमत :- १७,६३,९५५ (लक्ष)
वेळ :- सकाळी ११:१५ वाजता
८).कारंजा जि. वाशिम महावीर कॉलनी येथील पांडे घर ते राठोड घर दत्त कॉलनीमध्ये कॉक्रीट रस्ता च नाली बांधकाम करणे.
अंजदाजपत्रकीय किंमत :- ४०,४३,७७४ (लक्ष)
वेळ :- सकाळी ११:३० वाजता
९).कारंजा जि. वाशिम येथील वनदेवि मंदीर बाय पास येथे सभागृह बांधकाम करणे.
अंजदाजपत्रकीय किंमत :-१६,००,५६९(लक्ष)
वेळ :- सकाळी १२:०० वाजता
१०).कारंजा जि. वाशिम येथील गुड्डू मनवर ते सुधाकर नाईक वैभव लक्ष्मी कॉलनी येथे सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.अंदाजपत्रकीय किंमत :- १७,२२,१८३ (लक्ष)
वेळ :- दुपारी १२:१५ वाजता
११).शिक्षक कॉलनी मधील हनुमान मंदीर ते शिरे सर घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे.
अंदाजपत्रकीय किंमत :-३६,८१,५३६(लक्ष)
वेळ :- दुपारी १२: ३० वाजता १२)कारंजा जि. वाशिम मातंगपुरा कारंजा येथे सामाजीक सभागृह बांधकाम करणे.अंदाजपत्रकीय किंमत :-१६,३२,९२० (लक्ष)
वेळ :- दुपारी १:०० वाजता १३).कारंजा जि. वाशिम येथील मंगरूळ वेश ते रामासावजी चौकापर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण व नाली बांधकाम करणे.अंदाजपत्रकीय किंमत :-१,२८,१०,४७९ (लक्ष)
वेळ :- दुपारी १:१५ वाजता १४).कारंजा जि. वाशिम येथील मंगरुळ वेश ते शिवाय नमः मठ पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे.
अंजदाजपत्रकीय किंमत :-५०,३२,२७१ (लक्ष)
वेळ :- दुपारी १:३० वाजता१५)कारंजा नगर परिषद हद्दीतील शौचालय बांधकाम करणे.अंदाजपत्रकीय किंमत :- ६६,२८,३३१ (लक्ष)वेळ :- दुपारी १:४५ वाजता होणार असून,वरील सर्व भूमिपूजन वेळेवर होत असून कारंजा शहरातील समस्त पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम सकाळी ठीक ९:०० वाजता कारंजा येथील लक्ष्मीनगर येथे उपस्थित राहावे ही, विनंती. असे आवाहन,समस्त भारतीय जनता पार्टी व महायुती कारंजाच्या वतीने करण्यात आल्याचे वृत्त, करंजमहात्म्य न्यूज नेटवर्क्स कारंजाचे प्रमुख संजय कडोळे यांना मिळाले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....