खऱ्या अर्थाने सुनिलभाऊ धाबेकर यांच्या सारखे विकास पुरुषच कारंजा मानोरा येथील रखडलेला विकास पूर्ण करू शकतात. *कारंजा (लाड)* कारंजा विधानसभा मतदार संघाचे दोन वेळा आमदार व राज्यमंत्री असतांना आपल्या कार्यकाळात दिवंगत योजना महर्षी सहकार नेते स्व. बाबासाहेब धाबेकर यांनी मतदार संघाला कर्मभूमी मानून अनेक विकासाभिमुख कामे शासनाकडून पूर्ण करुन घेतली. मतदार संघातील मतदारांना ते दैवत मानायचे. मतदारांविषयी आस्था,वेळेवर काम करण्याचे त्यांचे नियोजन, कौशल्य,हजरजवाबीपणा आणि प्रशासनातील अधिकारी वर्गावर त्यांचा असलेला वचक त्यामुळे मतदार संघात ते लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे त्यामुळे त्यांच्या मृत्युनंतरही त्याचे फार मोठे मित्रमंडळ आणि मतदार आज देखील त्यांच्या कार्याचा आणि कारकिर्दीचा गौरव करीत असतात. त्यांच्याबद्दल बोलतांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते खेर्डा काळीचे माजी सरपंच प्रदिप वानखडे म्हणाले की, "जल हे अमृत समजून"ते मतदार संघातील नागरीकांना मिळालेच पाहीजे.या भावनेतून त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून कारंजा शहरातील नागरीकांची पिण्याच्या पाण्याची अडचण कायम स्वरूपी संपविण्यासाठी पिंप्री फॉरेस्ट येथील अडाण धरणातूनच थेट पाईपलाईन टाकून पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून दिली. त्यामुळे कारंजेकरांनी त्यांनी केलेल्या व्यवस्थेप्रती जागरूक राहून कर्तव्यदक्ष राहीले पाहीजे.त्यांनी तालुक्यात गॅसप्लॅन्ट आणून हजारो मजूरांच्या हाताला कायमस्वरुपी रोजगार मिळवून दिला. अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्या.माझ्या सारख्या कारंजा शहरात राहणाऱ्या सर्वसाधारण व्यक्तिला खेर्डा काळी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून मिरविण्याचा सन्मान मिळवून दिला. कारंजा येथे महाविद्यालय, सहकारी सुतगिरणी सुरु केली. कारंजा येथील सुशिक्षित बेरोजगार असलेले इंजिनिअर,मॅकेनिकल,कामगार, मजूरांच्या हाताला काम मिळावे म्हणून महाराष्ट्र औद्योगीक वसाहत महामंडळाकरीता मंजूरात आणली.सदरहू एमआयडीसी प्रकल्पाच्या अभ्यासाकरीता त्यांनी आम्हाला इचलकंरजी येथे पाठवीले होते मी त्या प्रकल्पाचा साक्षीदार आहे. परंतु दुदैवाने हा प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात पूर्ण होऊ शकला नाही व पुढे रद्द झाला.
आता विधान सभा निवडणूका जाहीर झालेल्या असून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातून त्यांचे सुपूत्र सुनिल पाटील धाबेकर हे वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवीत आहेत.सुनिल पाटील धाबेकर हे प्रामाणिक, चारित्र्यवान,विश्वासू आणि हजरजबाबी नेतृत्व ओळखले जात असून त्यांनी तेरा वर्ष सहकार क्षेत्रातील भूविकास बँकेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. शिवाय ते जिल्हा परिषद सदस्य असून गटनेते आहेत. आपल्या वडीलां प्रमाणेच त्यांना कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील नागरीकांच्या मुलभूत गरजांची जाण असून ते कारंजा मानोरा विधान सभा मतदार संघाचा सर्वोतोपरी विकास करू शकतात. असे आपले प्रांजळ मत असल्याचे खेर्डा काळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रदिप वानखडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना दिलेल्या मुलाखतीत सांगीतले आहे.