भारतीय जनता पक्षाच्या वतीने चार एप्रिल मंगळवार रोजी दुपारी चार वाजता स्थानिक रेणुका नगर बाबलेश्वर मंदिर जवळील स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या पुतळ्यापासून विदा सावरकर सन्मान गौरव यात्रा तसेच 13 एप्रिल रोजी स्थानिक क्रिकेट ओबीसी पश्चिम विदर्भ महा कुंभमेळा, 11 एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत समता सप्ताह सहा एप्रिल भाजपा स्थापना दिवस साजरा होणार व भाजपा शिवसेना सरकारने क्रीडा संकुल एईदलाबाद इथे मंजूर केले आमदार सावरकर यांनी अकोला पूर्व मतदार संघाच्या वतीने राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहे तसेच रूपनाथ महाराज संस्था दहीहंडा व परसोबळे येथील देवस्थानाला आणि सर्विस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आहेअसल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.
स्थानिक सर्किट हाऊस इथे भाजपातर्फे गौरव सन्मान यात्रा संदर्भाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद मध्ये आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल अनुप धोत्रे तेजराव थोरात गिरीश जोशी माधव मानकर संजय गोडफोडे, संजय जीरापुरे, अक्षय जोशी संजय झाडोकार डॉक्टर अमित कावरे डॉक्टर बाबुराव शेळके संजय जोशी, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी व काँग्रेस जन वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहे याच्या विरोधात सावरकर यांच्या चरित्र संदर्भात व त्यांच्या सन्मार्गात गौरव यात्रा राष्ट्रभक्त व विविध संस्थेच्या नेतृत्वात रेणुका माता मंदिर रेणुका नगर येथील बाबळेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुपारी चार वाजता चार एप्रिल रोजी यात्रा निघून ही यात्रा दाबकी रोड कस्तुरबा गांधी मार्ग विठ्ठल मंदिर चौक जय हिंद चौक सिटी कोतवाली स्टँड रोड अग्रेसर महाराज चौक दुर्गा चौक गणेश स्वीट मार्ट राऊतवाडी बारा ज्योतिर्लिंग मंदिर जवाहर नगर चौक सिविल लाईन चौक पार्क अशोक वाटिका चौक नवीन बस स्टॅन्ड चौक ते बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह सुप्रसिद्ध वक्ते व अभ्यासा क प्राध्यापक सतीश फडके यांचा विविध सावरकर यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यानमाळा आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमात सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती आमदार सावरकर यांनी यावेळी केली यावेळी भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी प्रास्तावित केले.
त्यावेळी सहा एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली तसेच 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतीय जनता पक्षाचे विविध आघाड्या साजरी करणार आहे तसेच 13 एप्रिल रोजी विदर्भ पश्चिम विदर्भातील ओबीसी समाजाचा मोठा मेळावा महा कुंभमेळा स्थानिक क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित करण्यात आली आहे या दृष्टीने सुद्धा विविध समित्या क्षगठीत करण्यात येणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व पश्चिम विदर्भातील लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा होणार आहे अशी ही यावी आमदार सावरकर यांनी माहिती दिली तसेच बिर्ला राम मंदिर ते न्यू तापडिया नगर भागात जाण्यासाठी अंडरग्राउंड अंडर पुल फुल निर्माण होणाऱ्या तसेच उड्डाणपुलासाठी सुद्धा निधी आणून तो काम लवकरात लवकर पूर्ण होणार अशी माहिती त्यांनी दिली तसेच सिंचन प्रकल्पाला सुद्धा राज्य शासन निधी उपलब्ध करून देऊन विकास कामाला गती मिळणार अशी माहिती आमदार सावरकर यांनी दिली