dyrto.37-mh@gov.in या ई-मेल आयडीवर तुमचे नाव, मोबाईल क्रमांक आणि तिकीटाची प्रत पाठवा!
वाशिम: ऐन दिवाळीत गावाकडे जाणाऱ्या सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकणाऱ्या खासगी बसचालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी वाशिमचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आता मैदानात उतरले आहे! दरवर्षी सणासुदीला प्रवाशांना वेठीस धरून दुप्पट-तिप्पट भाडे उकळणाऱ्या या 'भाडेखोरां'विरुद्ध आरटीओने धडक मोहीम सुरू केली आहे.
जर वाशिम जिल्ह्यातील कोणत्याही खासगी कंत्राटी बसवाल्याने तुमच्याकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा १ रुपयाही जास्त घेतला, तर तो थेट कायद्याच्या कचाट्यात सापडणार! २७ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयानुसार त्यांच्यावर कठोरतम कारवाईची तलवार लटकत आहे.
प्रवाशांनो, 'लुटले' जात असाल तर गप्प बसू नका!
तुमचा प्रवास महागडा करणाऱ्या या बसचालकांना धडा शिकवण्याची संधी तुमच्या हातात आहे. जर कोणी जास्त भाडे आकारले, तर तत्काळ त्याचे तिकीट आणि माहिती गोळा करा आणि क्षणाचाही विलंब न करता dyrto.37-mh@gov.in या ई-मेल आयडीवर तुमचे नाव, मोबाईल क्रमांक आणि तिकीटाची प्रत पाठवा!
तुमच्या एका तक्रारीमुळे त्या 'लूट' करणाऱ्या बसवाल्यावर मोटार वाहन कायद्याखाली मोठी कारवाई होऊन त्याला जेलची हवा खावी लागू शकते! उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संग्राम जगताप यांनी थेट इशारा दिला असून, आता दिवाळीच्या नावाखाली प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही!