देशाच्या सर्वोच्च म्हणजे राष्ट्रपती पदी श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची प्रचंड मताधिक्य घेऊन निवड होऊन एका आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च पदी निवड झाल्याबद्दल व राज्यातील बहुप्रतिक्षित ओबीसी राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्ते पणामुळे स्थगित झाले ते शिंदे व फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडली व पुन्हा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील 27%आरक्षण पूर्ववत प्राप्त करून दिले याबद्दल राज्य सरकार चे आभार मानून भाजपा कार्यालय आरमोरी येथे फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा प्रकाश बगमारे, ब्रम्हपुरी विधानसभा विस्तारक प्रा कादर शेख, नगर महामंत्री तथा माजी नगरसेवक मनोज भूपाल,ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष प्रेमलाल धोटे,ब्रम्हपुरी शहर अध्यक्ष प्रा डॉ अशोक सालोडकर,माजी शहर अध्यक्ष फकीरा कुर्वे,जेष्ठ नेते प्रा संजय लांबे,अशोक तुनडुलवार,सुरेश बनपूरकर डांगे व अन्य उपस्थित होते .फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला